फोटो सौजन्य - Social Media
वर्ष संपत आलं पण आपली सुपरस्टार सई ताम्हणकर अजूनही अनेक प्रोजेक्ट्सच्या शूट मध्ये बीजी आहे. 2024 वर्षात सई ने बॅक टू बॅक काम करून तिच्या प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका आणि अनेक आव्हानात्मक काम करून तिने हे वर्ष खास करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. बॉलिवूड सोबतीने मराठीत सईच्या अभिनयाची जादू सगळ्यांनी पाहिली. 2024 वर्षाची सुरुवात अभिनेत्रीने “श्री देवी प्रसन्न” या मराठी चित्रपटाने केली आणि वर्षाचा शेवट तिने धगधगत्या “अग्नी” या मालिकेमधून केला आहे.
भक्षक, अग्नी हे दोन हिंदी चित्रपट प्रेक्षकांना विशेष आवडले आणि त्याच कौतुक देखील तितकच प्रेक्षक करत आहेत. सोबतीला “मानवत मर्डर्स” सारखी कमालीची वेब सीरिज आणि सईचा कधीही न पाहिलेला लूक यातून प्रेक्षकांना अनुभवता आला. या मालिकेने आणि सईच्या अभिनयाने प्रेक्षकांना चकित करून टाकले. 2024 वर्षात सईने तिच्या कमालीच्या भूमिका साकारत बॉलिवुडला भुरळ घातली आणि बॉलिवुड मध्ये सईच्या कामाचा बोलबाला देखील झाला. अग्नी असो किंवा भक्षक सईने बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी आणि हक्काची जागा निर्माण केली आहे. आणि येणाऱ्या वर्षात देखील ती अनेक बड्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे.
‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग, लग्नाच्या पूर्वीच्या विधींना सुरूवात; पाहा Photos
सई 2024 मध्ये मोस्ट बॅंकेबल स्टार ठरली आहे आणि हे तिने तिच्या कमामधून सिद्ध केलं आहे. वर्षभरात सईने केलेले सगळेच प्रोजेक्ट्स चर्चेत राहिले आणि याचं कारण देखील तितकच खास आहे असं म्हणायला हरकत नाही. तिने वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित भूमिका तर केल्या पण सोबतीने वेगवेगळ्या भाषांमध्ये तिने आपले काम सुरु ठेवले. सई ही तिच्या रोजच्या भूमिका पेक्षा प्रेक्षकांना खूप वेगळी दिसली. तिच्या कामातून वेगळ्या धाटणीच्या भूमिका प्रेक्षकांनी बघितल्या आणि त्याला भरभरून प्रेम देखील दिलं. सईने तिच्या अभिनय कौशल्याने आधीच चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. तिचे नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.
Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या मुलांनी तोडफोडनंतर सोडले घर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!
वर्षभरात अभिनेत्री सई ताम्हणकरने अनेक प्रोजेक्ट्स ची घोषणा केली यात मुख्यपणे बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा बोलबाला जास्त पाहायला मिळाला. सई इथेच थांबणार नाही आहे. अभिनेत्री येणाऱ्या काळात “डब्बा कार्टेल, मटका किंग” या बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये देखील झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मोठे स्टार कलाकार पाहायला मिळणार आहे. तर ती मराठीत “गुलकंद, बोल बोल राणी” या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामधील तिची भूमिका देखील नवी असणार आहे. वर्ष संपलं तरी सईच काम तितक्याच जोमात सुरू आहे. येणाऱ्या वर्षात सई अजून काय काय भूमिका साकारणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.