असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसत अगदी तसंच स्मिता पाटील यांच्या देखील लागू झालं. लहानपणासूनच त्यांना नृत्य, नाटक, लेखन याची आवड होती. शिक्षण पूर्ण करत त्या त्यांची आवज देखील जोपासायच्या. पुढे दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी करियरा सुरुवात केली. कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने बातम्या देणं आणि निर्भिड व्यक्तिमत्व त्यांच्या बातम्या देण्य़ाची शैली हीच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं कारण ठरली. जेष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेकरांनी स्मिता पाटील .यांच्या कॅमेरासमोरचा वावार पाहिला आणि त्यांनी स्मिता यांचा सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. तो स्मिता यांचा पहिला वहिला सिनेमा म्हणजे ‘चरणदास चोर’.या सिनेमाच्या माध्यमातून स्मिता पाटील यांनी अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली.
तो एका काळ असा होता जेव्हा अभिनेत्री ही दिसायला सुंदर आणि गोऱ्या वर्णाची असणं अपेक्षित असायचं. मात्र स्मिता पाटील यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मनं जिंकून घेतली. या एकमेव अभिनेत्री अशा होत्या ज्या मेकअपपासून लांब असायच्या. त्या जशा आहेत तशाच त्या कॅमेऱ्यासमोर यायच्या. रंग सावळा असला म्हणून काय झालं आपल्या टॅलेंट हवं आणि त्याच्याच जोरावर आपण पुढे जातो हा आत्मविश्वास येणाऱ्या अनेक पिढ्यांना देणारी अशी ही अभिनेत्री होती.
भूमिका, मथंन, अर्ध्य सत्य अशा अनेक बॉलिवूड सिनेमात स्मिता पाटील झळकल्या. इतकं सगळं असलं तरी, मराठी प्रेक्षकांच्या मनात स्मिता पाटील यांच्याबद्दल अगदी आजच्या प्रेक्षकवर्गात देखील प्रेम जिव्हाळा आणि आदर पाहायला मिळतो. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, जैत रे जैत मधील चिंगी आणि उंबरठा मधली सुलभा. या दोन्ही व्यक्तिरेखा आजही तितक्याच प्रभावशाली वाटतात. एखादं गाणं म्हटलं की आपल्य़ाला त्याचा गीतकार, गायक आणि संगीतकार आठवतो. मात्र सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं असो किंवा मग मी रात टाकली गाण्यातील चिंगीचा बंडखोरपणा असो यातल सर्वार्थाने पहिले आठवतात त्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. आज त्यांना जाऊन 39 वर्ष झाली. मात्र आजही स्मिता पाटील हे नावं प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
Ans: स्मिता पाटील यांनी सौंदर्याच्या रूढ कल्पनांना छेद देत अभिनयाच्या ताकदीवर स्वतःची ओळख निर्माण केली. सावळा रंग, साधेपणा आणि नैसर्गिक अभिनय यामुळे त्या इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या ठरल्या.
Ans: स्मिता पाटील यांनी करिअरची सुरुवात दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि निर्भीड सादरीकरणामुळे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यातूनच त्यांना पहिला चित्रपट मिळाला.
Ans: ‘जैत रे जैत’ मधील चिंगी आणि ‘उंबरठा’ मधील सुलभा या भूमिका आजही मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या व्यक्तिरेखांमधील स्त्रीस्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि बंडखोरी आजही तितकीच प्रभावी वाटते.






