फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय घडली घटना :
अभिनेत्री स्वाती देवलने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे. ती म्हणते की “बोरिवली वेस्टमध्ये स्थित असलेल्या बाजारामध्ये शॉपिंग करत असताना. तिच्याजवळ एक तरुणी येते. तिला म्हणते की तुम्हाला बायबलविषयी काही तरी सांगायचे आहे. अभिनेत्रीला काय घडतंय? हे लक्षात येताच ती त्या बाईला प्रत्युत्तर देते आणि तिथून पसार होते. पण त्याचवेळी अभिनेत्री त्या बाईवर लक्ष ठेवण्यासाठी जवळच उभी राहते. ती पाहते की त्या बाईसह आणखीन एक मुलगी आहे जी बायबलची महती सांगण्यासाठी त्या गर्दीत हजर आहे.
त्या दोघी काहीतरी कानात गुजबुजतात. स्वातीने हे सगळं पाहिलं पण तिने खंत व्यक्त केली की तिला या सगळ्या गोष्टी कॅमेरात रेकॉर्ड करण्याचे त्यावेळी सुचले नाही.
चाहत्यांना दिला संदेश :
पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने संदेश दिला आहे. तिने नमूद केले आहे की, “जय महाराष्ट्र. सावधान. काळजी घ्या, फसू नका. अशा लोकांशी बोलू नका, तुम्ही तुमच्या मतांशी, विचारांशी, हिंदुत्वाशी, तुमच्या पंथ, जातीशी एकनिष्ठ रहा…. बी serious, be careful आणि हो मंडळी तुम्ही आपले आहात म्हणून सांगितले. जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय.”
अभिनेत्री सध्या लक्ष्मी निवास मालिकेमध्ये काम करत आहे. याआधी तिने कळत नकळत, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकांमध्ये काम केले आहे.






