फोटो सौजन्य - Social Media
काय होती लग्नाची अट?
अपूर्वा नेमळेकरने लग्नापुर्वीच्या काही अटी शेअर केल्या आहेत. अपूर्वा म्हणते की,”लग्न करण्याअगोदर माझ्या काही अटी होत्या. मला जोडीदार मराठीच हवा होता. पण तो घटस्फोटित हवा. कारण, मला असा जोडीदार हवा होता ज्याने आयुष्यात दुःखाची चव अनुभवली आहे. कारण मला माझा जोडीदार माझे दुःख समजून घेणारा हवा होता.” एकंदरीत, अपूर्वाचे आधीही लग्न झाले आहे परंतु काही कारणांमुळे त्या नात्यात फूट पडली आणि घटस्फोट झाला. अपूर्वाला योग्य जीवनसाथी मिळाला. तनुज गोवळकर स्वतः मराठी आहे आणि घटस्फोटितसुद्धा!
तनुजविषयी सांगताना अपूर्वा म्हणते की, “माझ्या आयुष्यात एक काळ इतका बिकट होता की मी कारमध्ये एकटी बसून रडत असायचे. पण जेव्हा माझ्या आयुष्यात तनुज आला तेव्हा माझे रडणे पूर्णपणे थांबले. माझ्यासाठी महत्वाची एक गोष्ट म्हणजे तनुजने साधा चॉकलेट जरी खाल्ला तरी तो अर्धा तरी चॉकलेट माझ्यासाठी राखून ठेवतो. मला आधी कधी असे प्रेम कधीच मिळाले नव्हते. तनुज माझी फार काळजी करतो.”
‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’,’ प्रेमाची गोष्ट’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून समोर आलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने 14 फेब्रुवारी ( Valentine Day ) चा मुहूर्त साधून तनुज गोवळकरसह विवाहबंधन बांधले आहे. अभिनेत्री आणि तिचा पती, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.






