कायमच मसालेभात खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत हरियाली राईस, पौष्टिक चवीचा हेल्दी पदार्थ
भारतीय जेवणाच्या ताटातील मुख्य पदार्थ म्हणजे भात. जेवणात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. कितीही चविष्ट आणि चमचमीत पदार्थ खाल्ले तरीसुद्धा भात ताटात कायमच हवा असतो. पण नेहमीच भात डाळ किंवा मसालेभात खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. प्रत्येकाला जेवणात काहींना काही नवीन पदार्थ हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारा हरियाली राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला हरियाली राईस लहान मुलांच्या डब्यापासून ते अगदी घरी पाहुणे जेवायला आल्यानंतर सुद्धा तुम्ही बनवू शकता. हा राईस बनवताना तुम्ही त्यात वेगवेगळ्या भाज्या आणि कडधान्याचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे चव चांगली लागते आणि लहान मुलं भाज्यांचे सेवन करतात. लहान मुलांना कायमच नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. कारण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळी चव चाखण्याची सगळ्यांचं इच्छा होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






