(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. उर्मिलाने तुझ्याविना या मालिकेतून अभिनेय क्षेत्रात 2003 साली पदार्पण केले आहे. अलिकडेच आलेल्या बाईपण जिंदाबाद या मालिकेच्या एपिसोड्समध्येही ती पाहायला मिळत आहे. सध्या उर्मिलाचे फिल्टर कॉफी हे नाटक सुरू आहे. शिवाय तिने पुन्हा घाशीराम कोतवाल या नाटकातही छोटी भूमिका साकारली आहे.
अभिनेत्रीने स्वत:च्या हिंमतीवर या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयाचे नेहमी कौतुक होते. मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा पती मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिलाच्या नात्याबद्दल नेहमी चर्चा रंगलेली पाहायला मिळते. उर्मिला आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या वैवाहिक आयुष्यात सारे काही आलबोल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर तिने कधीच प्रतिक्रिया दिली नाही मात्र तिने यासंदर्भात मौन सोडले आहे.
ते त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे राहत असून उर्मिला एकटी जिजाचा सांभाळ करते असे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. अलिकडेच उर्मिलाला एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सोशल मीडियावर उडणाऱ्या अफवांबद्दल भाष्य केले तसेच ट्रोलिंगवरही तिने उत्तर दिले आहे.
या मुलाखतीत उर्मिला म्हणाली, “ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी कमेंट्स वाचतच नाही. कमेंट्समध्ये लोक खूप टॉक्झिक असतात त्यामुळे मी लक्ष देत नाही. तसंही माझ्याकडे इतर खूप व्याप असतात त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलतंय याकडे लक्ष देण्यात मला रस नसतो. इंटरनेटवर आपल्याबद्दल काय बोललं जातंय याकडे लक्ष द्यायचं नसतं.ज्या गोष्टी इंटरनेटवर फिरत असतात त्यातल्या काही खऱ्या असतात तर काही खोट्या असतात. प्रेक्षकांना एकच सांगेन तुमच्यापर्यंत जे पोहोचतंय ते सगळं खरंच आहे असं मानून चालू नका. त्यातलं काही खरं असेल तर काही खोटंही असू शकतं.”
पुढे तिने तिच्या लेकीबद्दल सांगितले, जिजाला आम्ही सोशल मीडियापासून दूरच ठेवले आहे. अगदी युट्यूबही पाहू देत नाही. ओटीटी शोज आमच्याकडे आता जास्त पाहिले जातात.”
Emmys Awards मध्ये चमकला दिलजीत दोसांझ, पण हाती लागला नाही एकही पुरस्कार; चाहते झाले निराश
उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा प्रेम विवाह आहे. त्यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांना 2017 साली जीजा नावाची गोंडस मुलगीही झाली. मात्र त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे.






