(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Abhijit Majumdar Death: अभिजित मजुमदार यांचे निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिद्धार्थ खिरीडचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला असून, त्याच्या लग्नाचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘फ्रेशर्स’, ‘मुलगी झाली हो’ आणि ‘राणी मी होणार’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून सिद्धार्थने घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा हा अभिनेता आता खऱ्या आयुष्यातही नव्या भूमिकेत पदार्पण करत आहे. अभिनेत्याच्या लग्नाला मराठी कलाकारांची उपस्थिती देखील दिसून आली आहे.
अभिनेत्याच्या लग्नाला कलाकारांची हजेरी
काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. गोव्याच्या समुद्रकिनारी त्याने आपल्या प्रेयसीला फिल्मी अंदाजात प्रपोज केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले. अखेर सिद्धार्थने त्याची प्रेयसी डॉ. मैथिली भोसेकर हिच्यासोबत विवाह केला आहे. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.
लग्नसोहळ्यात सिद्धार्थ गुलाबी रंगाच्या कुर्त्यात तर मैथिली पारंपरिक नऊवारी साडीत अत्यंत सुंदर दिसत होती. तसेच नवरदेव देखील तिच्या सोबत मॅचिंग पोशाखात हँडसम दिसत होता. नवविवाहित जोडप्यावर सध्या चाहत्यांसह कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास सोहळ्याला अभिनेत्री गौरी किरण, अमृता देशमुख, सृजन देशपांडे, प्रसाद जवादे आणि रश्मी अनपट यांसारख्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
सिद्धार्थची पत्नी कोण आहे?
सिद्धार्थची पत्नी डॉ. मैथिली भोसेकर सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास असून तिने Miss International World Petite 2022–23 हा मानाचा किताब पटकावला आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखणाऱ्या या जोडप्याने अखेर आपल्या नात्याला विवाहा करून नवं नाव दिलं आहे. या दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहते देखील आनंदी झाले आहेत.






