बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Mithun Chakraborty Health Condition Update) मिळाला आहे. त्यांना सोमवारी (12 फेब्रुवारी) रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता मिथुनची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. रुग्णाबाहेर येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याच सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रकृतीची काळजी न घेतल्याबद्दल रागावले असल्याचे मिथुन यांनी म्हटलं.
[read_also content=”खराब हवामान असूनही खेळवला सामना, अंगावर विज पडून खेळाडूचा मैदानात मृत्यू! https://www.navarashtra.com/sports/player-death-in-football-ground-in-indonesia-while-playing-in-ground-nrps-506599.html”]
मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर आनंद व्यक्त करताना मिथुन म्हणाले होते की, हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो.
त्यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2023 मध्ये मिथुन सुमन घोषच्या सुपरहिट बंगाली चित्रपट काबुलीवाला मध्ये दिसले होते. 2022 मध्ये, त्याने विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात निवृत्त IAS अधिकारीची भूमिका केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ही मिळाला होता.