स्टँड अप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकीला (Munawar Faruqui) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील एका हुक्का पार्लरवर छापा (hookah bar raid)टाकत असताना पोलिसांनी ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. फारुकीसह आणखी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तपास सुरू आहे. तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकल्याचे बोलले जात आहे.
[read_also content=”बी देओलचा ‘आश्रम 4’ या वर्षी रिलीज होणार! अभिनेता चंदन रॉयने दिला इशारा https://www.navarashtra.com/movies/animal-star-bobby-deol-starrer-aashram-season-4-release-this-year-nrps-517942.html”]
मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आल्याचे वृत्त आहे. फारुकी आणि इतर ताब्यात घेतलेल्या लोकांविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, छाप्यादरम्यान फारुकी हुक्का बारमध्ये उपस्थित होता आणि त्याचे मेडिकलही करण्यात आले. अहवालानुसार, त्याला नंतर जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बोरा बाजारातील सबलन हुक्का बारवर पोलिसांनी छापा टाकला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘तेथे लोक हर्बल हुक्क्याच्या वेषात तंबाखूचा हुक्का वापरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या टीमने हुक्का बारवर छापा टाकला. तंबाखूचा हुक्का वापरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुद्ध COTPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.
दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टनुसार, फोर्ट परिसरात सुरू असलेले हे हुक्का पार्लर बेकायदेशीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. छाप्यादरम्यान 4400 रुपये रोख आणि 13 हजार 500 रुपये किमतीचे 9 हुक्क्याचे भांडे जप्त करण्यात आले.
2021 मध्ये त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता, त्यानंतर त्याला महिनाभर तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर शो रद्द झाल्यामुळे त्याने कॉमेडी सोडण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, 2022 मध्ये तो रिॲलिटी टीव्ही शो लॉक अपद्वारे कॅमेरासमोर परतला. नंतर तो बिग बॉसचा भागही बनला आणि जिंकला.