बिग बॉस १७ : टेलिव्हिजनवरचा सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस सीजन १७ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या घरामध्ये रोज नवनवीन काही तरी घडत असत. जेव्हापासून मुनावरची मैत्रिण आयशा खानने शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. तेव्हापासून मुनावर आणि मन्नारा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. मन्नारा सतत मुनावरला टोमणे मारताना दिसत आहे. मात्र यावेळी मुनावर मन्नारावर चांगलाच संतापलेला दिसत आहे. नुकताच बिग बॉस १७ चा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये मुनवर मन्नारावर भडकलेला दिसत आहे.
या प्रोमोमध्ये सर्वात आधी मन्नाराने मुनव्वरच्या माजी प्रेयसीबद्दल असे काही म्हटले आहे, ज्यानंतर स्टँडअप कॉमेडियनने आपला संयम गमावला आणि घराची तोडफोड करण्यास सुरुवात केली. समोर आलेल्या प्रोमोमध्ये आयशा मन्नाराला ‘दोन लोकांच्या पाठिंब्याने खेळात पुढे जात आहे’ असे सांगताना दिसत आहे. याला उत्तर देताना मन्नारा म्हणते- ‘तुम्ही कोणाचा आधार घेतला? तू पुढच्या वर्षी वैयक्तिकरित्या येऊ शकत नाही, जसे की त्याची बाहेरची मैत्रीण पुढच्या वर्षी वैयक्तिकरित्या येईल.