फोटो सौजन्य: शर्मिला शिंदे इन्स्टाग्राम
चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये महत्वाचा मानला जाणारा, ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ आणि ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२५’ पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक चित्रपटातील आणि नाटकांतील कलाकारांना महत्वाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेली पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी तिचे खास कौतुक केले आहे.
झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेमध्ये दुर्गाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मिला शिंदे ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या नाटकात ‘आरती’ ही विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहे. शर्मिलाला ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्यात यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’पात्रासाठी अवॉर्ड मिळाला आहे. यानिमित्ताने सविस्तर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानले आहेत.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री शर्मिला शिंदे म्हणते,
“तू करू शकतेस, तुझ्यात ती ताकद आहे” असं मला चंद्रकांत लोकरे दादाने नाटकाच्या प्रोसेस मध्ये एकदा खास बसवून सांगितलं होतं. काही लोकांच्या Success स्टोरीजची उदाहरणं जोडत मला पक्क Motivate केलं होतं. आता चंदू दादाने आपल्यावर दाखवलेला विश्वास चुकीचा ठरू द्यायचा नाही आणि चंदू दादाला हरू द्यायचं नाही असं ठरवलं आणि तिथेच ‘आरती’ हे पात्र साकारण्याचा माझा Base तयार झाला.
प्रियदर्शन जाधवबरोबर काम करायची इच्छा माझ्या मनात काही वर्षांपासून होती. तशी ती मेसेजद्वारे मी एकदा व्यक्त सुद्धा केली होती. अखेर ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’च्या निमित्ताने ती पूर्ण झाली. दर्शनकडून खूप काही शिकायला मिळालं. तो सांगेल तसं परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहिले. “लेखकाशी एवढ्या गप्पा कुठला आर्टिस्ट कधी मारत नाही” असं मला एकदा आमचा लेखक ऋषिकांत राऊत म्हणाला होता. पण, ‘आरती’सारखं पात्र लिहिणाऱ्या लेखकाशी तर मला अजून खूप बोलायचं आहे. मी खूप लकी आहे की, ते साकारण्याची संधी मला मिळाली. तुझ्या पहिल्याच व्यावसायिक नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. तुझ अभिनंदन.
मृणाल देशपांडेने डिझाइन केलेल्या लूकमुळे आरती मध्ये शिरणं एकदम सोपं होऊन जातं. It Speaks Before I Speak. मयुरेश केळुस्कर दर्शनची असिस्टेंट डायरेक्टर म्हणून तू जशी साथ दिली आहेस तशीच साथ, मदत तुझी मला पण झाली. Thank you for everything. आकाश, नितिन, निलेश, आदू तुम्ही दिलेला टेक्निकल सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुमचे मनापासून आभार.
पूर्णानंद वांधेकर… पूर्णा तुझ्याशिवाय आरती पूर्ण झालीच नसती. तू आरतीचा खरा Better Half आहेस. तिचा Half होऊन तिला तू Complete केलं आहेस. माझी on stage इतकी fantastic साथ दिल्याबद्दल तुझी खूप खूप आभारी आहे मी. Couldn’t have asked for a better Prakash Patil आपण खरे हॅशटॅग आकाश झालो तुझ्यामुळे. तीन मुली एकत्र एका मेकअप रूममध्ये, एका प्रोजेक्ट मध्ये न भांडता इतक्या प्रेमाने राहू शकत नाही असं म्हणणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून मी, सुरुची अडारकर आणि शर्वरी कुलकर्णी या नाटकात मजा करतो. You are my power puff girls. I love you