Chhaava Ott Release Know When And Where To Watch Vicky Kaushal Rashmika Mandanna Movie
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिग्दर्शन, अभिनय आणि गाणी अशा वेगवेगळ्या गोष्टींचं कौतुक होणाऱ्या चित्रपटाने रिलीजच्या ९ दिवसांत २९३.४१ कोटींची जबरदस्त कमाई केलेली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाचे एकट्या भारतातच नाही तर जगभरातून कौतुक केले जात आहे. चित्रपटाचे सर्वच सेलिब्रिटींकडून कौतुक होत असताना अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.
“बाणेदारपणा दाखवून त्याच्या कानाशिलात…” विशाखा सुभेदारची रणवीर अलाहबादियासाठी खास पोस्ट
शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा मुघलांनी केलेल्या छळावर भाष्य केलं आहे. चित्रपटाचे डायलॉगच्या माध्यमातून त्यांनी भाष्य करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये विश्वास नांगरे पाटील म्हणतात,
“छावा……
ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते!
‘मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गये जो बिनलढे, उनपर हैं धिक्कार!’
केवढी उमेद, केवढी प्रेरणा देणारे हे शब्द! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.
‘हाथी घोडे, तोफ तलवारे
फौज तो तेरी सारी हैं
पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा
अब भी सब पे भारी हैं !’
छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून ?
आम्ही घ्यावा निर्भयपणा,
आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी,
विचारांची आणि कृतींची
आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं,
घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द,
करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म !
समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा !
राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी,
शेर शिवराज आणि त्यांचा छावा !
जगदंब जगदंब !”
‘हिच्या सौंदर्याने तर काळ्या रंगालाही रंगीत केले…’; दिशा परमारवर सौंदर्याचा भडीमार
१३० कोटींचा बजेट असलेला ‘छावा’चित्रपट बॉक्स ऑफिसवर १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. शिवप्रेमींकडून चित्रपटाला रिलीज झाला त्या दिवसापासून दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने ९ दिवसांत देशात २९३.४१ कोटींची जबरदस्त कमाई केलेली आहे. तर जगभरात ३८९ कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. संतोष जुवेकरने रायाजी हे पात्र साकारले आहे, तर विनित सिंह कवी कलश या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, आशुतोष राणा, सारंग साठ्ये, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत.