भर कॉन्सर्टमध्ये निक जोनासला मारण्याचा प्रयत्न? जीव मुठीत घेऊन लाईव्ह कार्यक्रमामधून पळाला
जगभरात लोकप्रिय असलेल्या प्रियांका चोप्राचा पती निक जोनासचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. प्रियंकासोबत लग्न केल्यानंतर तो अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. निक जोनास एक प्रसिद्ध सिंगर आहे. त्याची गाणी जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या निक जोनास एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. निक जोनास म्युझिकल वर्ल्ड टूर कॉन्सर्टमध्ये व्यग्र आहे. तो आणि त्याचा भाऊ केविन वेगवेगळ्या शहरात जाऊन त्यांची गाणी गाऊन आपल्या फॅन्सचे मनोरंजन करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – गँगस्टर लाँरेन्स बिश्नोईची स्टोरी रुपेरी पडद्यावर दिसणार, सलमान खान मुख्य भूमिकेत ?
गेल्या काही दिवसांपूर्वी निकचा आणि त्याच्या भावाचा पॅरिसमध्ये कॉन्सर्ट झाला होता, त्यानंतर आता प्रागमध्ये त्यांच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या एका गोष्टीमुळे निक जोनास चर्चेत आला आहे. निक पण इथे तो परफॉर्मन्स करतानाच अचानक स्टेजवरुन पळून गेला. या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. निक प्रागमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना आपल्यावर कोणीतरी लेझर लाइटच्या माध्यमातून लक्ष्य करत आहे, हे त्याला कळताच त्याने तात्काळ त्या कॉन्सर्टमधून पळ काढला.
व्हायरल व्हिडिओमध्ये, निकने त्याच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांना इशारा करत स्टेजवरून खाली उतरून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. निक स्टेजवरून खाली येत थेट पळत पळतच बाहेर आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये निकवर लेझर लाइटने कसा निशाणा साधला गेला, हे सुद्धा अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. परफॉर्म करत असताना लाईव्ह शोमध्ये लेझरने लक्ष्य केल्यामुळे निक जोनसने लाईव्ह कार्यक्रमातूनच पळू लागला.
हे देखील वाचा – ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चनचा घटस्फोट ? अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशीच सर्व कळलं
यावेळी त्याने हातवारे करत शो थांबवण्याचे संकेतही मॅनेजमेंटला दिले. त्याच्यासोबत परफॉर्मन्ससाठी आलेले इतर कलाकार स्टेजवरच उभे होते. नंतर, सुरक्षा रक्षकांनी निकवर लेझर लाईट मारणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले, काही वेळाने कॉन्सर्टला पुन्हा एकदा सुरुवात झाली. या प्रकरणामुळे निक जोनासच्या चाहत्यांनी त्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शिवाय, त्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
Pessoal, uma fã subiu esse vídeo onde mostra exatamente o momento que o laser mira no Nick durante a performance no palco B.
Acredita-se que ele tenha se assustado. Não se sabe ainda a origem do lazer.
O show continuou normalmente, após a pausa.Oq acham? #nickjonas pic.twitter.com/fCi2ba8X4S
— Jonas Brothers Brasil (@JBoficialBR) October 15, 2024