बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असतो. या फोटोशूटबाबत त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. जेव्हापासून रणवीर सिंगने हे फोटोशूट केले आहे, तेव्हापासून काही सेलिब्रिटी स्टेटमेंट देत आहेत. अर्जुन कपूर आणि आलिया भट्टसह सर्व स्टार्स त्याच्या समर्थनात उभे दिसत आहेत. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या मते, लैंगिक समानतेसाठी न्याय मागण्याचा हा रणवीर सिंगचा मार्ग आहे. ते पुढे म्हणाले, ‘जर महिला आपले शरीर दाखवू शकतात तर पुरुष का नाही? पुरुषांनाही महिलांसारखेच अधिकार मिळाले पाहिजेत. मला वाटतं, शेवटी आपला देश जुन्या काळापासून बाहेर पडत आहे. मला वाटतं समानतेबाबत रणवीर सिंगच्या बाजूने एक विधान आहे.
विशेष म्हणजे रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत रणवीर सिंगवर ‘महिलांच्या भावना दुखावल्याचा’ आरोप करण्यात आला आहे. एका एनजीओने रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल केल्याचेही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.