सध्या मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा सुरू आहे. टिव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधे सोढी हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग अचानक गायब झाला आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिासांनी आता अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. हे फूटेज पाहिल्यानंतर हे अपहरणाचे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
[read_also content=”‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, दिल्ली पोलीसांकडून तपास सुरू! https://www.navarashtra.com/movies/taarak-mehta-ka-ooltah-chashmah-roshan-singh-sodhi-aka-gurucharan-singh-missing-nrps-527625.html”]
नुकत्याचं समोर आलेल्या महितीनुसार 22 एप्रिल 2024 पासून गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. “जवळपास 4 दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीतील पालममध्ये गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी सांगितल की तो घरुन मुंबईला जाण्यासाठी निघाला मात्र, तो मुंबईत पोहोचलाच नाही. या तक्रारीच्या त्याआधारे आता पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी गुरूचऱण राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.
रिपोर्टनुसार, २५ एप्रिलला दुपारी त्याच्या वडिलांनी पालम पोलिसांत तक्रार दिली होती, तपासात आता पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे, ज्यात गुरुचरण जाताना दिसतोय. २४ एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरू होता, पण आता तो बंद येत आहे. पोलिसांनी त्याच्या फोनच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील तपासले असून त्यात विचित्र गोष्टी आढळल्या आहेत. त्याने अनेक आर्थिक व्यवहार केल्याचंही दिसून आलंय, हे आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटत आहेत. आता पोलीस त्याच्या फोनही तपासत असून अजून काही महत्त्वाची समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.