प्रतीक बब्बरने सांगितली सुशांत सिंह राजपूतची अपूर्ण इच्छा, खुलासा करत म्हणाला…
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला साडेचार वर्षे झाली आहेत; परंतु त्याचे चाहते आणि त्याचे कुटुंबीय आजही त्याच्या आठवणींमध्ये रमले आहेत. त्यांच्याकडून सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीची आणि त्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली जात असते. सुशांतच्या हयातीत रिलीज झालेला शेवटचा चित्रपट ‘छिछोरे’ ठरला. या चित्रपटामध्ये सुशांत सिंह सोबत अभिनेता प्रतीक बब्बरनेही काम केले आहे. नुकतंच अभिनेत्याने सुशांत सिंगबद्दल खुलासा केला आहे. त्याने सुशांतची अपूर्ण इच्छा सांगितलीये.
हे देखील वाचा – मौनी रॉयच्या ग्लॅमरसचा जबरदस्त तडका, साडीतल्या फोटोंनी चाहत्यांना लावलं ‘वेड’
२०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘छिछोरे’ चित्रपटात प्रतीक बब्बरने सुशांतबरोबर काम केलं होतं. सुशांतचा हा त्याच्या हयातीतील शेवटचा चित्रपट होता. सुशांत सिंह राजपुत १४ जून २०२० रोजी त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूला आज साडेचार वर्षे झाले असले तरीही त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. काहींच्या मते सुशांतने आत्महत्या केली आहे तर, काहींच्या मते त्याची हत्या झाली आहे. त्याच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आली होती, पण अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत सुशांतचे कुटुंबीय आणि त्याचे नातेवाईक आहेत. नुकतीच प्रतीक बब्बरने ‘फिल्मीग्यान’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने ‘छिछोरे’ चित्रपटाच्या दरम्यानचे काही किस्से सांगितले आहे. शुटिंग दरम्यान सुशांतने प्रतीकला त्याची इच्छा सांगितली होती. याचा खुलासा प्रतीकने मुलाखतीतून केला आहे.
प्रतीक बब्बरने ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुशांतला ‘छिछोरे’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर एकटेच अंटार्क्टिकाला जाण्याची इच्छा त्याने सांगितली होती. प्रतिक बब्बर सुशांतच्या फार जवळचा व्यक्ती नव्हता, पण जेव्हा दोघे बास्केटबॉल सीन शूट करण्यासाठी थांबले होते, त्यावेळी दोघांमध्ये हे संभाषण झालं होतं. मुलाखतीत प्रतीकने पुढे सांगितके की, “सुशांतचं व्यक्तिमत्व थोडं वेगळं होतं. त्याने मला सांगितलं होतं की, ‘यार, मी ना शूटिंग संपल्यानंतर अंटार्क्टिकाला जाणार आहे.” २०१९ मध्ये सुशांतने त्याच्या खासगी सोशल मीडिया अकाऊंटवर ५० गोष्टींची ड्रीम लिस्ट शेअर केली होती. त्यात विमान उडवण्यापासून लेफ्ट हॅण्डेड क्रिकेट खेळण्यापर्यंत आणि मुलांना अंतराळाच्या गोष्टी शिकवण्याची स्वप्नं त्यात लिहिलेली होती. दुर्दैवाने, सुशांतने ५० पैकी फक्त १३ स्वप्नंच पूर्ण करू शकला.