दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 : द रुल’ (pushpa 2 ) या चित्रपटाचा नुकताचं टिझर रिलीज करण्यात आला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचं चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे वेगळं सांगालया नको. याचं कारण म्हणजे पुष्पा 2′ चा हा टीझर यूट्यूबवर गेल्या 138 तासात 110 दशलक्ष पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला आहे.
[read_also content=”अज्ञानात केलेल्या गोळीबारात सलमान खानच्या घरात घुसली गोळी, घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर! https://www.navarashtra.com/movies/bullet-entered-in-salman-khan-house-have-seen-cctv-footage-outside-house-nrps-523598.html”]
‘पुष्पा 2’ चा टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला म्हणजेच 8 एप्रिल 2024 रोजी रिलीज झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा टीझर यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन पायात घुंगरू, कानात झुमके आणि निळ्या रंगाची साडी घातलेला दिसत आहे. त्याचा हा अवतार प्रेक्षकांना आवडला आहे. ‘पुष्पा 2’ चा हा टीझर यूट्यूबवर गेल्या 138 तासात 110 दशलक्ष पेक्षा जास्त दर्शकांनी पाहिला आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. 2021 मध्ये सुकुमारने ‘पुष्पा’ हा चित्रपट आणला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आता ‘पुष्पा’चा सिक्वेल ‘पुष्पा 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर आतापर्यंत दीड कोटींहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पुन्हा एकदा ‘पुष्पा’च्या अवतारात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अल्लू या चित्रपटात जपानी भाषा बोलताना दिसणार आहे. एवढेच नाही तर ‘पुष्पा २’ ची निर्मिती सुकुमार यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे. चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.