ड्रामा क्वीन राखी सावंत (rakhi sawant ) आणि ड्रामा यांच खास नातं आहे. राखी तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवरुन ड्रामा करत असते. काही दिवसांपुर्वी तिच्या लग्नावरुन सुरू असलेला ड्रामा सध्या संपला आहे. अखेर आदिलच्या (adil khan durrani ) लग्नाची बाब मान्य केली आहे. राखीसोबत केल्याची त्याने सांगितलं आहे
गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती रडताना दिसत होती. जेव्हापासून राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो मीडियामध्ये आले होते, तेव्हापासून राखी आणि आदिलचे लग्न झाले की नाही यावर सस्पेंस होता. कारण राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर अधिकृत घोषणा केली होती, मात्र आदिलने याबाबत मौन बाळगलं होत.मात्र आता तो सस्पेन्सही संपला आहे. आदिलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून अधिकृत घोषणा केली आहे. आदिलने राखीसोबतचा निकाहचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले – त्यामुळे आता मी अखेर ही अधिकृत घोषणा करत आहे. मी राखीशी लग्न केले नाही असे कधीच म्हटले नाही. पण मला काही गोष्टी सांभाळायच्या होत्या त्यामुळे गप्प बसावे लागले. आम्हा दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. यासोबतच आदिलने राखीच्या प्रेमाचे नाव पप्पुडीही लिहिले आहे.






