अभिनेता राम चरण (Ramcharan) आणि पत्नी उपासना (Upasana) कोनिडेला यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आज सकाळी रामचरणच्या पत्नीने मुलीला (Ramcharan And Upasana Baby Girl) जन्म दिला आहे. सोमवारी संध्याकाळी रामचरण आणि त्याची बायको उपासना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात आले. मंगळवारी पहाटे, त्यांच्या बाळाच्या जन्माची बातमी हॉस्पिटलने बुलेटिनमध्ये शेअर केली आहे. लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनंतर राम चरण आणि उपासना आई-वडील झाले आहेत.
हैदराबादच्या ज्युबिली हिल्स भागातील अपोलो रूग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं की, “रामचरण आणि पत्नी उपासना कोनिडेला यांना मंगळवारी पहाटे (20 जून 2023) एक गोंडस मुलगी झाली आहे. अपोलो हॉस्पिटल जुबली हिल्स, हैदराबादमध्ये या मुलीचा जन्म झाला आहे. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.”
Welcome Little Mega Princess !! ❤️❤️❤️
You have spread cheer among the
Mega Family of millions on your arrival as much as you have made the blessed parents @AlwaysRamCharan & @upasanakonidela and us grandparents, Happy and Proud!! ??— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) June 20, 2023
रामचरणचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस चाहत्यांना गुड न्यूज दिली होती, राम आणि उपासना लवकरच आई-बाबा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आता त्यांना नात झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. आपल्या छोट्या परीचं त्यांनी स्वागत केलं आहे.
रामचरणचे वडिल आणि टॉलिवूडचे सुपरस्टार चिरंजीवी आजोबा झाल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आलंय. चिरंजीवी आणि पत्नी सुरेखा हे दोघेही आपल्या लाडक्या नातवाला पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.
चिरंजीवी हे टॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. त्यांना सुष्मिता, श्रीजा आणि रामचरण ही तीन मुले आहेत. राम चरणचं 14 जून 2012 रोजी लग्न झाले होते. आता लग्नाच्या 11 वर्षानंतर त्याला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. खूप वर्षांनतर त्यांच्या घरी पाळणा हलला असल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची इच्छा पूर्ण झाली. रामचरणच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन झाल्याने संपूर्ण कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.