फोटो सौजन्य - Social Media
निखिल कामथ यांच्याशी चर्चा करताना रणबीर कपूरने अमीर खानसोबत घडलेला त्याचा किस्सा सांगितला. त्याची ही घटित गोष्ट ऐकून अमीर खानच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. रणबीर म्हणतो कि विदेशात असताना अमीरने त्याला एक किस्सा सांगितला होता. त्यात अमीरसोबत काही असे घडले कि आजही त्या गोष्टीचा पश्चाताप अमीरला आहे. काम करत असताना वेळेवेळेवर त्याला त्या गोष्टीची जाणीव होत असते. या गोष्टींमुळे तो कधी काळी उदासही असतो. रणबीरने या गोष्टीचाही खुलासा केला कि अमीरच्या त्या किस्स्यामुळे रणबीरला फार मोठा धडा मिळाला आहे तसेच तो त्याचे वेळोवेळी पालन करत असतो.
अमीरचा त्या किस्स्याविषयी सांगत असताना, रणबीर म्हणतो कि,” माझी आणि अमीरची दोन वर्षपूर्वी विदेशात भेट झाली होती. तेव्हा त्यांचा जरा उदास चेहरा पाहून मी त्यांना विचारले कि काय झालं? तेव्हा ते म्हणाले कि,’मी माझ्या आयुष्याचे तीस वर्ष फिल्म लाईनमध्ये घालवले आहे. माझ्याकडे फक्त एकंच नातं आहे जे कि दर्शकांशी आहे. माझे माझ्या आईशी, माझ्या मुलांशी, माझ्या बायकोशी काहीच नातं नाही आहे.” रणबीरने भावुक होऊन अमीरचा हा किस्सा मुलाखतीत सांगितला.
रणबीर सांगतो कि अमीरची ही गोष्ट ऐकून त्याला खूप काही शिकायला मिळाले. रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये बॅलन्स किती महत्वाचा आहे, ते कळाले. रणबीर म्हणतो कि,” या प्रोफेशनमध्ये असच असतं. कलाकाराला त्याचं सगळं काही अर्पण करावं लागतं. मी सदैव प्रयत्न करत असतो कि मी माझ्या रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये बॅलन्स टिकवून ठेवू.” रणबीर कपूरचा नुकताच ऍनिमल सिनेमा हिट ठरला. यानंतर रणबीर त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सच्या तयारीत आहे. रणबीर आगामी काळात ऍनिमल पार्क, रामायण तसेच लव्ह अँड वॉर या चित्रपटांमध्ये दिसून येईल.