कोलकाता- सिने अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज कोलकत्याच्या दौऱ्यावर आहे. इस्ट बंगाल फुटबॉल क्लबचच्या ग्राऊंडवर दबंग द टूर नावाच्या एका कार्यक्रमात सलमान सहभागी होणार आहे. तिथं सलमानचा लाईव्ह शोही होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी सलमान खान कालीघाट परिसरात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banergee) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. सलमान खान यांनी ममता दीदींच्या भेटीची वेळ मागितल्याचं सांगण्यात येतंय.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ट्विट करुन जाहीर केलं आहे की, सलमान खान १३ तारखेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहे. त्यासाठी सलमान त्यांच्या घरी जाणार आहे. त्यानंतर तो लाीव्ह शोसाठी तिथून रवाना होईल. गेल्या काही काळापासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्य़ा आहेत, त्यामुळे सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येते आहे. कोलकाता पोलिसांनीही सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याची माहिती आहे.
सलमान खानला मिळालेल्या धमक्यांमुळे त्याचा हा दौरा यापूर्वी स्थगित करण्यात आला होता. यापूर्वीच कोलकात्यात हा कार्यक्रम होणार होता, मात्र धमक्यामुळं तो पुढं ढकलण्यात आला होता. इस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या वतीनं अधिकाऱ्यांनी सलमानला निमंत्रित केल्याची माहिती आहे.
या कार्यक्रमात सलमानसोबत सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. त्यात जॅकलिन फर्नांडिस, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, प्रभू देवा, गुरु रंधवा यांच्यासह इतरही अभिनेते-अभिनेत्री असणार आहेत. सलमाननंही व्हिडीओच्या माध्यमातून फॅन्सना तो येणार असल्याचं कळवलं आहे. या सोचं तिकिट 700 ते 4000 रुपयांपर्यंत आहे.