प्राप्ती आणि महिमाच्या दिवाळीच्या आठवणी
सण म्हणजे आपलेपणाचा, प्रेमाचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंददायी अनुभव. दिवाळी ही अशीच एक संधी आहे जी आपल्याला आप्तेष्ट, सखेसोबती आणि भावंडांबरोबर जुन्या आठवणी जागवण्याची संधी देते. कलाकार देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना करत आहेत. अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि महिमा म्हात्रे यांनी त्यांच्या दिवाळीच्या आठवणी आणि दिवाळी साजरी करण्याच्या खास पद्धती सांगितल्या.
सावली फेम प्राप्ती काय सांगतेय
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर म्हणाली, “जर सुट्टी मिळाली तर मी माझ्या आई- वडिलांबरोबर दिवाळी साजरी करेन. माझ्या लहानपणीची एक खास आठवण म्हणजे माझ्या नानीच्या घरी आम्हा लहान मुलांमध्ये दरवर्षी पहाटे ४ वाजता कोण पहिलं फटाका वाजवतो याची स्पर्धा असायची. आई-वडिलांनी आणलेले नवीन कपडे घालून मरीन लाइन्सला जाणं, हे फार जिव्हाळ्याचं आहे माझ्यासाठी. गेल्या ५ वर्षांपासून मी फटाके फोडणं थांबवलं आहे कारण वायूप्रदूषण खूप होतं. माझ्या छोट्याशा कृतीने निसर्ग वाचत असेल तर का नाही? मात्र दिवाळी साजरी करण्याचे विविध मार्ग आहेत. मी कुटुंबासोबत फराळ करणे, नातेवाईकांना भेटणे आणि फराळ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे हा माझ्यासाठी दिवाळीचा एक खास भाग आहे.” प्राप्ती पुढे म्हणाली “माझं व्यक्तिमत्व फुलबाजी आणि चकरी सारखं आहे. फुलबाजीसारखं ‘तडतड’ करत मी सेटवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असते.
‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत
महिमा म्हात्रेने शेअर केल्या आठवणी
‘तुला जपणार आहे’ मालिकेतील मीराची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे म्हणाली, “दिवाळी आम्ही खूप पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. नरक चतुर्दशीला लवकर उठून उटणं लावणं, दिवे लावणं, कुटुंबासोबत फराळ करणं, देवदर्शन आणि नातेवाईकांना भेटणं हे सगळं एकत्रित करत दिवाळीची मजा वाढते. या वर्षी मी खूप उत्सुक आहे कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी, कारण ‘तुला जपणार आहे’ च्या शूटमुळे कुटुंबाला भेटायला वेळ मिळत नाही. पण दिवाळीच्या दिवशी मी घरीच असणार आहे. दरवर्षी आम्हा भावंडांची एक परंपरा आहे की आम्ही भाऊबीजेच्या दिवशी कुठेही असलो तरी एकत्र येतो. माझा भाऊ ध्रुव माझ्या खूप जवळचा आहे. ध्रुव आणि माझी तन्वी ताई दोघांनीही मला खूप साथ दिली आहे, मार्गदर्शन, कौतुक केलं आहे आणि मला माझ्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली.”
दिवाळी म्हणजे एकत्र येण्याचा आणि आपुलकीच्या बंधांनी नाती घट्ट करण्याचा सण आहे. कलाकारांच्या या आठवणी आपल्या साऱ्यांनाही आपल्या बालपणात घेऊन जातात. नात्यांची ही दिवाळी अशीच प्रेमाने उजळत राहो.
दोन्ही मालिका वेगळ्या वळणावर
सध्या सावली आणि पारू या दोन्ही मालिकांचा महासंगम असून सावली आणि सारंग एका मोठ्या संकटात अडकले आहेत आणि सावली यावेळी सारंगला कशी साथ देणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे ‘तुला जपणार आहे’ मालिकेत मीराने अंबिकाची सुटका केली असली तरीही तिच्या स्वतःवर अनेक संकट येत आहेत. मंजिरीचा चेहरा कधी तिच्यासमोर येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळी स्पेशल एपिसोड्सची चाहते उत्सुकतेने वाटत पाहत आहेत.
मंजिरीचा डाव पुन्हा फसणार; सत्याचा विजय होणार, ‘तुला जपणार आहे’ मालिकेला नवं वळण