मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले कलाकार सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीबाबत एक मोठ अपडेट समोर आले आहे.
[read_also content=”‘इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही’ नेपोटिज्मवर विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत! https://www.navarashtra.com/movies/vidya-balan-on-nepotism-industry-kissi-ke-baap-ki-undustry-bahi-hai-nrps-523124.html”]सयाजी शिंदे
अभिनेते सयाजी शिंदे यांना छातीत दुखू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सातारा रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यावर त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे डॉक्टरांना आढळले. सयाजी यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, सयाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटत होते. रुटीन चेकअप म्हणून त्याच्या काही चाचण्या झाल्या. ईसीजीमध्ये काही बदल दिसून आले. हृदयाच्या एका छोट्या भागात कमी हालचाल जाणवली. त्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या तीन रक्तवाहिन्यांपैकी एका रक्तवाहिन्यामध्ये ९९ टक्के ब्लॉकेज असल्याचे समोर आले. हे लक्षात येताच अभिनेत्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
आनंदाची बाब म्हणजे सयाजी शिंदे यांची प्रकृती आता स्थिर आहे. याशिवाय, उद्या म्हणजेच 13 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सयाजी शिंदे यांनी मराठी, बॉलीवूड आणि टॉलिवूडसह इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्यांनी कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.