Television News Sharad Upadhye Slams Nilesh Sable Share His Experience About Chala Hawa Yeu Dya Show
अभिनेता निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून एक्झिट घेणार असून त्याच्या ऐवजी सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेता येणार आहे. काल अनेक माध्यमांनी यासंदर्भात बातमी देखील दिली होती. निलेशच्या जागी अभिजीत खांडकेकर दिसणार असल्याचं शिक्कामोर्तब झालंय. निलेश ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडणार म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मंडळी आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. निलेश ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडणार असल्याच्या बातमीवर ज्योतिष अभ्यासक शरद उपाध्याय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केलेली आहे.
पुणेकर दुपारी १ ते ४ का झोपतात ? अभिनेत्री नेहा शितोळेने सांगितलं कारण…
राशीचक्रकार शरद उपाध्येयांनी निलेश साबळेबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी राशीचक्रकार शरद उपाध्ये यांना ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना देण्यात आलेली वागणूक आणि त्यांना आलेला अनुभव फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शेअर केलाय. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
‘जे देव देऊ शकत नाही ते डॉक्टर देतात…’ अजय देवगणच्या लेकीला रोजलिन खानने झापलं
आदरणीय नीलेश साबळे…
आपल्याला ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्याजागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा. पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एका- दोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेश स्वभाव मनमिळाऊ असावा साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.