'भुल भुल्लैया ३'नंतर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश, कोण दिसणार मुख्य भूमिकेत?
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये हॉरर कॉमेडी युनिव्हर्सची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या युनिव्हर्समध्ये ‘भेडीया’, ‘मुंज्या’, ‘स्त्री २’ आणि ‘भुल भुल्लैया ३’ हे सिनेमे प्रदर्शित झाले. या सिनेमांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. प्रेक्षक या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देत असून अशातच आणखी एका बॉलिवूड चित्रपटाचा या यादीमध्ये समावेश होणार आहे.
‘भेडीया’, ‘मुंज्या’, ‘स्त्री २’ आणि ‘भुल भुल्लैया ३’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एका प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकांनी हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील नवीन चित्रपट करण्याची शक्यता आहे. मिलाप झवेरी असं त्या दिग्दर्शकांचं नाव असून ते आपल्या नव्या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दिशा पटानी यांना घेण्याची शक्यता आहे.
बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या चित्रपटात दिग्दर्शकांनी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला आणि अभिनेत्री दिशा पटानीला कास्ट करण्यात आले आहे. हा चित्रपट युथ सेंट्रिक हॉरर कॉमेडी चित्रपट असण्याची शक्यता आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमासाठी सिद्धार्थ आणि दिशा खूपच उत्सुक आहेत. मिलाप झवेरी दिग्दर्शित चित्रपट हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे.
त्या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार असून तो पहिल्यांदाच हॉरर- कॉमेडी चित्रपट करणार आहे. त्यामुळे तो स्वत: त्या चित्रपटासाठी उत्सुक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक हा हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील चित्रपट वेगळ्या पद्धतीने करण्याच्या विचारात आहे. अश्विन वर्दे आणि सुभाष काळे एकत्र या हॉरर कॉमेडी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाची शुटिंग 2025 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – “पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं…” संकर्षण कऱ्हाडेची सध्याच्या राजकारणावरील कविता तुफान व्हायरल, एकदा वाचाच
काही दिवसांपूर्वी विकास बहलच्या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीला कास्ट करण्यात आल्याचे वृत्त आले होते. तो फ्यूचरिस्टिक सायन्स फिक्शन चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत वामिका गब्बी आणि जया बच्चन यांसारखी तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत होती. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी एका कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये नोरा फतेहीही दिसणार आहे.