आधी घर, आता नवी कार! ‘आई कुठे...’ फेम अभिनेत्रीने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान कार
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत मालिकेतील कलाकार प्रसिद्ध झाले आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारही कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. मराठीसह हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आली आहे. तिने मालिकेत संजनाचं पात्र साकारलंय. अभिनेत्री रुपाली भोसले हिने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर एक गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने एक नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांना आणि आपल्या मित्र मैत्रिणींना ही गुड न्यूज दिली आहे.
हे देखील वाचा – “पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं…” संकर्षण कऱ्हाडेची सध्याच्या राजकारणावरील कविता तुफान व्हायरल, एकदा वाचाच
दिवाळी हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे. या सणावेळी सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी नवीन घर, नवीन कार किंवा इत्यादी गोष्ट खरेदी करत असतात. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावरच अभिनेत्रीनेही नवीन कार खरेदी केली आहे. तिने जून महिन्यामध्येच नवीन घर खरेदी केलं. तिने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. अभिनेत्रीने नव्या घराची वास्तुशांती मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने घातली होती. रुपालीच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला तिच्या अनेक खास सेलिब्रिटी मित्रांनी उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते. खऱ्या अर्थाने रूपाली २०२४ हे वर्ष अगदीच खास ठरलं होतं.
नवीन कार खरेदी केल्याचा व्हिडिओ रुपालीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “नव्या कारचं आमच्या घरी स्वागत आहे…” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रुपाली आपल्या कुटुंबासह पाहायला मिळत आहे. रुपालीच्या नव्या गाडीचे स्वागत करण्यासाठी तिच्यासोबत तिचे आई- बाबा आणि तिचा भाऊ सुद्धा पाहायला मिळाला. यावेळी अभिनेत्री मराठमोळ्या अंदाजात दिसली. तिने हिरव्या रंगाची साडी आणि क्रिम कलरचा ब्लाऊज वेअर केला होता. अभिनेत्रीने आई-बाबांच्या हस्ते नव्या आलिशान गाडीचं स्वागत केलं. रुपालीच्या नव्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – ड्रेस सोनम कपूरचा, चर्चा रोहित बालची; अभिनेत्रीचा हटके आऊटफिट पाहिलात का ?
अभिनेत्री रुपाली भोसलेने नवी गाडी खरेदी केल्यानिमित्ताने इतर कलाकार मंडळींसह तिचे चाहते शुभेच्छा देत आहेत. सचित पाटील, रेश्मा शिंदे, गिरीजा प्रभूसह अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एक चाहता म्हणतो, “तुझा शून्यापासून ते इथपर्यंतचा प्रवास आहे. तू खरंच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.” तर दुसरा चाहता म्हणतो, “एक महिला आपल्या घरासाठी खूप काही करू शकते.” यासोबतच अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव केला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.