बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचा विवाह सोहळा आज पार पडला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात लग्न केलं. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम ‘पिंक अँड व्हाईट’ अशी होती. वर पक्षातील पाहुण्यांनी पांढऱ्या तर वधू पक्षातील पाहुण्यांनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले होते. रिपोर्टनुसार, लग्नसोहळ्यासाठी कियारानं पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरची डिझायनर शेरवानी परिधान केली होती. शाही थाटात हा विवाह सोहळा पार पडला.
It’s official! Sidharth Malhotra, Kiara Advani are now married Read @ANI Story | https://t.co/9hhnWRlasN#SidharthMalhotra #KiaraAdvani #SidKiara #BollywoodWedding pic.twitter.com/7W2HMe7ayK — ANI Digital (@ani_digital) February 7, 2023
संध्याकाळी 5 वाजता कियारा आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांना हार घातले आणि 6 वाजता सप्तपदीचा विधी झाला. त्यानंतर सिद्धार्थ आणि कियारानं लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा यांची वेडिंग रिसेप्शन पार्टी रात्री 9 वाजता सुरु होणार आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या विवाह सोहळ्याला करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, जूही चावला, मनीष मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेले आऊटफिट परिधान केले होते.
[read_also content=”बॉक्स ऑफिसवर पुन्हा घुमणार ‘कांतारा’चा आवाज, चित्रपटाला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर ऋषभ शेट्टीने केली प्रीक्वेलची घोषणा https://www.navarashtra.com/entertainment/rishabh-shetty-announces-kantara-prequel-after-completing-100-days-of-film-nrsr-368060/”]
सोमवारी संगीत फंक्शनच्या आधी सिद्धार्थ आणि कियारा यांचा रोका झाला. कियाराला लग्नाचा चुडा घालण्यात आला. मंगळवारी सकाळी हळदी समारंभ झाला. दोघांच्या कुटंबातले लोक आणि जवळचे मित्रमैत्रिणी यावेळी उपस्थित होते. लग्नातली प्रत्येक गोष्ट खास ठेवण्यात आली आहे. मेन्यूपासून व्हेन्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाआधी 6 फेब्रुवारीला मेहंदी आणि संगीत सोहळा झाला. संगीत नाईटसाठी सुर्यगढ पॅलेसवर गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली होती. गुलाबी रंगात सजलेल्या सुर्यगढ पॅलेसचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.