फोटो सौजन्य: Pinterest
Kia Carens Clavis HTE (EX) व्हेरिएंट तीन वेगवेगळ्या ICE powertrain पर्यायांसह उपलब्ध आहे. G1.5 petrol व्हेरिएंटची किंमत 12,54,900 रुपये, G1.5 टर्बो पेट्रोल व्हेरिएंट 13,41,900 रुपये, तर D1.5 डिझेल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 14,52,900 रुपये आहे. हा नवीन व्हेरिएंट सध्याच्या HTE (O) च्या वर पोझिशन करण्यात आला असून, तो केवळ 7-seater configuration मध्येच उपलब्ध आहे.
अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य
HTE (EX) व्हेरिएंटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे G1.5 petrol इंजिनसोबत पहिल्यांदाच Skylight Electric Sunroof देण्यात आली आहे. या किमतीत सनरूफ मिळणे ही बाब या कारला वेगळे बनवते. साधारणपणे सनरूफ ही सुविधा महागड्या व्हेरिएंटमध्येच पाहायला मिळते, मात्र Kia ने ती अधिक परवडणाऱ्या व्हेरिएंटमध्ये देत ग्राहकांना मोठा फायदा दिला आहे.
सनरूफसोबतच Kia Carens Clavis HTE (EX) मध्ये केबिन अधिक आरामदायक करणारी अनेक फीचर्स जोडण्यात आली आहेत. यामध्ये पूर्णतः ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल देण्यात आले असून, त्यामुळे कोणत्याही हवामानात केबिनमधील तापमान आरामदायक राहते. एक्सटीरियरमध्ये LED daytime running lamps आणि LED position lamps देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचा लूक अधिक प्रीमियम दिसतो. केबिनमध्ये चांगल्या प्रकाशासाठी LED केबिन लॅम्प्स देण्यात आले आहेत. याशिवाय ड्रायव्हर साइड पॉवर विंडोमध्ये ऑटो अप आणि डाउन फंक्शन देण्यात आले असून, तो सोयीसह सुरक्षेच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरतील.
अरे गाडी आहे की रणगाडा! Sanjay Dutt ने खरेदी केली Tesla ची ‘हे’ पॉवरफुल वाहन, किंमत वाचूनच उडून जाल
Kia च्या म्हणण्यानुसार, HTE (EX) व्हेरिएंट ग्राहकांच्या फीडबॅक आणि बदलत्या बाजार गरजा लक्षात घेऊन लाँच करण्यात आला आहे. मिड-व्हेरिएंट शोधणाऱ्या ग्राहकांना sunroof आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी महत्त्वाची फीचर्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे, हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.






