Nick Shinde Sundara Marathi Song Announcement
सोशल मीडियावर सध्या अनेक मराठी गाण्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएंसर निखिल शिंदे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अनेक गाण्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. आता अशातच त्याच्या नवीन गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘चाल तुरु तुरु’, ‘नौलखा हार’ आणि ‘मराठी ठेका’ नंतर निक शिंदेचं आणखी एक गाणं रिलीज होणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. त्याच्या नव्या गाण्याचा पोस्टर पाहून चाहते कमालीचे आतुर आहेत.
‘किती वेळ लागेल? माझ्या स्टुडिओला ये…’ राजेश्वरी खरातने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव
गेल्या काही दिवसांपूर्वीच डान्सर गौतमी पाटीलचं ‘कृष्ण मुरारी’ हे गाणं रिलीज झालं होतं. तिच्या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता ‘कृष्ण मुरारी’ गाण्याच्या ग्रँड सक्सेसनंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक दर्जेदार गाणं “सुंदरा”. या गाण्याची माहिती अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. काही तासांपूर्वीच निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचं पहिलं वहिलं पोस्टर शेअर केलं आहे..
‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक
“रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” ” असे कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केली आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की निकची सुंदरा नेमकी कोण असेल? लवकरच निकचं “सुंदरा” हे गाणं रिलीज होणार असून चाहत्यांना त्याच्या गाण्याची उत्सुकता आहे.