(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दिसली तू पहिल्यांदा २’ हे गाणं केवळ रोमँटिक आहे असे नाही, तर त्यात रॅपचा आधुनिक आणि जोशपूर्ण टचही आहे. या मिश्र शैलीमुळे हे गाणं विविध वयोगटातील प्रेक्षकांना आवडते आहे. यासोबतच गाण्यातील संगीतमय आणि लयबद्ध ताल, तसेच अनुश्री मानेच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यास मदत केली आहे.सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून आपला प्रवास सुरू करणाऱ्या अनुश्री मानेने अभिनयातही जम बसवला. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चल भावा सिटीत’ या लोकप्रिय रियालिटी शोमधून अनुश्री मानेला विशेष लोकप्रियता मिळाली.बरं इतकंच नाही तर ‘नखरेवाली’, या अल्बम सॉंगमुळे ही अनुश्री खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली. या सगळ्यातच आता अनुश्रीच नव गाणं साऱ्यांच्या दिलाचा ठेका चुकवायला आलं आहे.
नेहमीच रिलेटेबल कंटेंटद्वारे रील व्हिडीओ बनवत अनुश्रीनं तिच्या चाहत्या वर्गांची मन जिंकलीच आहेत. आता पुन्हा एकदा ‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्यातून तिच्या अभिनयाच्या जादूने साऱ्यांना ती भुरळ पाडताना दिसली आहे. या गाण्यात अनुश्रीसह अक्या जाधव, तृप्ती राणे, ऋषी कणेकर, अस्मिता जाधव ही कलाकार मंडळी दिसत आहेत.
‘जगदंबा प्रोडक्शनस्’ प्रेझेंट ‘दिसली तू पहिल्यांदा २’ हे गाणं असून ऋतुजा कणेकरने या गाण्याच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. या गाण्याबाबत बोलताना अनुश्री म्हणाली, “आजवर माझ्या चाहत्यावर्गाने मला भरभरून प्रेम दिलं. आता पुन्हा एकदा ‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्यातून मी प्रेक्षकांच्या भेटीस आली असून आशा करते की या गाण्यालाही माझा चाहता वर्ग प्रचंड प्रेम देईल. मी नवनवीन विषय हाताळत प्रेक्षकांच्या भेटीस अधून मधून येत राहते पण माझा हा अल्बम सॉंगचा एक नवा प्रयत्न आहे आणि हे गाणं करताना मला खूप मजा आली. शिवाय बरंच काही नव्याने शिकायला मिळालं. मागे वळून पाहायचं नाही असं म्हणत मी आता माझा प्रवास सुरूच ठेवला आहे आहे प्रेक्षकांच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यावर राहो हीच इच्छा”.






