(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपटाच्या दुनियेत झगमगाट असला तरी कलाकारांच्या आयुष्यातील वास्तव काहीवेगळंच असतं. काहीजणांना आलिशान जीवनशैली लाभते, तर काहींच्या वाट्याला येतात फक्त संघर्ष आणि एकाकीपणा.असे अनेक उदाहरणे आहेत जिथे नाव कमावलेल्या कलाकारांचा शेवट अत्यंत दुःखद झाला. अशाच उदाहरणांपैकी एक होते तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रंगनाथ.
रंगनाथ यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि त्यांची एक वेगळी ओळख प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एकटेपणा, कौटुंबिक दुरावा आणि मानसिक तणावामुळे त्यांचा शेवट अत्यंत वेदनादायक ठरला.अखेरच्या क्षणी त्यांनी त्यांच्या संपत्तीचा वारस मुलांना न देता, आपली सेवा करणाऱ्या मीनाक्षी नावाच्या कामवालीच्या नावावर केली. जे अनेकांना धक्का देणारं होतं.त्यांचा मृत्यूही नैसर्गिक नव्हता. आत्महत्येने त्यांनी जीवन संपवलं, आणि शेवटी त्यांनी तडफडत जीव सोडला.
७०च्या दशकापासून तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले रंगनाथ यांनी सुरुवातीला कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, पण लवकरच त्यांनी नायक म्हणूनही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा असायचा. त्यांनी अनेक वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःख कुणालाच फारसं माहीत नव्हतं.
चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते भारतीय रेल्वेत टिकट कलेक्टर म्हणून काम करत होते. पण लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, त्यामुळे त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णपणे चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. १९७४ साली ‘चंदना’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं.यानंतर रंगनाथ यांनी जवळपास ४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.त्यांचा हा प्रवास साधा नव्हता, पण त्यांनी आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने स्वतःसाठी एक वेगळं स्थान निर्माण केलं.
२००९ साली पत्नीच्या निधनानंतर रंगनाथ मानसिकदृष्ट्या खूपच खचले शेवटच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आणि ते केवळ ५ हजार रुपये भाड्याच्या घरात राहत होते.२०१५ साली त्यांनी गांधी नगरमधील आपल्या घरात आत्महत्या करून सर्वांना धक्का दिला.