(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अभिनेता सुबोध भावे लवकरच ‘श्री बाबा नीम करोली’ महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हर हर महादेव’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘संत तुकाराम’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या चरित्रपटांमधून सशक्त अभिनय साकारणारा अभिनेता सुबोध भावे आता आणखी एका बायोपिकमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित हिंदी बायोपिकची घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटाचे नाव आहे ‘श्री बाबा नीम करोली महाराज’. या सिनेमात सुबोध भावे हे नीम करोली बाबा यांची भूमिका साकारणार असून, नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, या भूमिकेमुळे सुबोध भावेंच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
महेश बाबूची डेन्व्हरसह हातमिळवणी! नवं प्रीमियम कलेक्शन आणलं बाजारात
सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे नीम करोली बाबा यांच्या लूकमध्ये दिसत आहे. छोटे केस, थोडी दाढी, कपाळावर टीका आणि घोंगडी घेऊन बसलेल्या नीम करोली बाबा यांच्यासारखाच तो हुबेहुब दिसत आहे. या सिनेमाबद्दल सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं आहे की, ”आज लखनऊ मध्ये आमच्या आगामी ” बाबा नीम करोली” यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपटाच्या पोस्टर च अनावरण संपन्न झाले. बाबांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. लवकरच हा चित्रपट रसिकांसमोर येईल. जय श्रीराम!जय हनुमान! असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट केली आहे.
साई पल्लवी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या रडारवर, स्विमसूटवरील फोटोमुळे सोशल मीडियावर गोंधळ
कोण आहेत नीम करोली बाबा?
नीम करोली बाबांचा जन्म अंदाजे १९०० च्या सुमारास उत्तर प्रदेशातील अकबरपूर गावात झाला. त्यांचे मूळ नाव लक्ष्मीनारायण शर्मा होते. वयाच्या 17 व्या वर्षी बाबा नीम करोली यांना देवाबद्दल विशेष ज्ञान मिळाले. ते हनुमानजींना आपले गुरू मानत होते. बाबांनी आपल्या आयुष्यात जवळपास 108 हनुमान मंदिर बांधली आहेत. अनेक सेलिब्रिटींचे ते श्रद्धास्थान आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या आश्रमात गेले होते. तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही आश्रमाला भेट दिली होती.