(फोटो सौजन्य - Instagram)
सोनी लिव्हची कानखजुरा ही वेबसीरिज एका पछाडणाऱ्या कथेची झलक प्रेक्षकांना घडवणार आहे. या गोष्टीत शांतता फसवी आहे आणि नजरेआड लपलेल्या बाबी डोळ्याला दिसणाऱ्या बाबींहून खूपच घातक आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने एका अनोख्या जगाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या जगात अपराधीभाव पाठ सोडत नाही, रहस्ये उकळत राहतात आणि भूतकाळ सूड उगवतो. हे सगळं या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मॅगपाय या समीक्षकांनी नावाजलेल्या इझ्रायली मालिकेचे भारतीय रूपांतर ‘कानखजुरा’ मालिका मूळ कथेला एका वेगळ्या रूपात सादर करत आहे. या कथेत दोन दुरावलेल्या भावांमधील नात्याचा वेध घेण्यात आला आहे.
‘कानखजुरा’ या मालिकेमध्ये दोन विभक्त झालेल्या भावंडांना गडद भूतकाळाचा सामना करण्यास भाग पाडले जाते, जेथे ते जुन्या आठवणी आणि वास्तविकतेमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वत:च्या जुन्या आठवणींमुळे तुम्ही कधीच सुटका न होऊ शकणाऱ्या जाळ्यामध्ये अडकल्यास काय घडते हे सगळं या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
सलमान खानचा जीव पुन्हा धोक्यात? अज्ञात व्यक्तीकडून इमारतीत घुसखोरी
या मालिकेबद्दल आशूची भूमिका साकारणारा रोशन मॅथ्यू म्हणाला, ”सिरीज ‘कानखजुरा’ने माझे लक्ष वेधून घेतले, ज्यासाठी कारण म्हणजे कथानकामधील भावनिक प्रखरता आणि गोंधळादरम्यानची शांतता या मालिकेत दिसणार आहे. आशूची भूमिका लक्षवेधी आहे. जो क्षणोक्षणी भावूक होतो, पण त्याच्या शांत स्वभावापलीकडे मोठे वादळ लपलेले आहे. कथानक हृदयस्पर्शी आणि भयानक आहे. सिरीजमधील प्रत्येक नातेसंबंधामध्ये काही-ना-काही गुपित आहे आणि पात्रं याच गुपितांसह पुढे जातात, ज्यामुळे ही सिरीज अत्यंत धमाल आणि रोमांचक आहे.”
Cannes 2025 मध्ये फाटलेला ड्रेस का घालून आली उर्वशी रौतेला? अभिनेत्रीने सांगितले खास कारण!
अजय राय यांची निर्मिती आणि चंदन अरोरा दिग्दर्शित सिरीज ‘कानखजुरा’मध्ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे मोहित रैना, रोशन मॅथ्यू, साराह जेन डायस, महेश शेट्टी, निनाद कामत, त्रिनेत्र हल्दर, हीबा शाह आणि उषा नाडकर्णी हे सगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रख्यात इस्रायली सिरीज ‘मॅग्पी’वर आधारित ही सिरीज येस स्टुडिओजच्या परवान्यांतर्गत क्रिएटर्स आदम बिझान्स्की, ओमरी शेनहार आणि डाना एडेन यांच्याद्वारे हिंदी रुपांतरित करण्यात आली आहे. डोना आणि शुला प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित ही मालिका आहे. या सिरीजचे कथानक विभक्त झालेली कुटुंबं, विश्वासघात आणि दोष आणि जगण्यामधील लहान, भावूक क्षणांचा शोध घेते. ‘कनखजुरा’ ही मालिका ३० मे पासून फक्त सोनी लिव्हवर दाखवण्यात येणार आहे.