(फोटो सौजन्य - Instagram)
अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकूटाच्या अफलातून कॉमिक टायमिंगने सजलेला ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोन्हीही चित्रपट चांगलेच गाजले. आता प्रेक्षकांना आतुरता आहे, ती ‘हेरा फेरी ३’ची… ‘हेरा फेरी’चं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी तर ‘फिर हेरा फेरी’चं दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केलं होतं. पण ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते, ‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता अभिनेता सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी ३’बद्दल एक महत्वाची अपडेट दिली आहे.
मनोरंजनाचा डोस घेऊन येत आहे ‘आंबट शौकीन, कलाकारांची फौज करणार डबल मनोरंजन; पोस्टर रिलीज…
सध्या अभिनेता सुनील शेट्टी आणि सुरज पांचोली ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या निमित्त प्रमोशनमध्ये व्यग्र असून हा चित्रपट येत्या १६ मे रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी ३’च्या टीझरबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. अभिनेता सुनील शेट्टीने अमर उजाला दिलेल्या मुलाखतीत ‘हेरा फेरी ३’च्या टीझरबद्दल चाहत्यांना पूर्णपणे माहिती दिली आहे. मुलाखतीत सुनील शेट्टी ने सांगितले की, “आम्ही चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली असून टीझरही शूट केला आहे. आयपीएलदरम्यान हा टीझर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे आणि हो, मी खूप उत्साहित आहे, कारण तीच टीम आहे. हा चित्रपट नेहमीच इतर चित्रपटांपेक्षा वेगळा राहिला आहे.”
मुलाखतीत सुनील शेट्टीने शूटिंग सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना सांगितले की, “जेव्हा आम्ही तिघे (अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल) एकत्र येतो तेव्हा सेटवरील वातावरण मजेशीर असतं. खरे सांगायचे तर तिथे एक वॉर्निंग देणारा बोर्ड लावला पाहिजे, कारण आम्ही तिघे सोबत असलो की सेटवरील वातावरण बदलते. प्रियदर्शन सर नेहमीच बोलतात ती, जर तुम्हाला तिघांना मजा- मस्ती करायची असेल तर शुटिंगनंतर करा.” ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाची जोडी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहेत, ज्यांनी २००० मध्ये पहिला हेरा फेरी बनवला होता.
नवाजुद्दीन सिद्दिकीने बॉलिवूडला राम राम ठोकला? केली थेट पोलखोल
‘हेरा फेरी ३’ची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाबद्दल बऱ्याच काळापासून अनेक अफवा आणि विलंब होत होता. पण आता कलाकार आणि दिग्दर्शक एकत्र काम करत आहेत. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या अपडेटचा अर्थ असा की, चित्रपटाची रिलीज तारीख देखील लवकरच जाहीर केली जाईल. चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.