Sunita Ahuja says Govinda will never leave his family And His Wife for a stupid woman
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या बातम्या फार जोर धरु लागल्या आहेत. गोविंदा आणि सुनिता हे दोघेही गेल्या ३८ वर्षांपासून एकत्र असून, आता विभक्त होणार असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुनिता अहुजाने घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केले होते. या सर्व अफवा असल्याचं सुनिता माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाली होती. दरम्यान, आता एका मुलाखतीत सुनिताने स्वत:च घटस्फोटाबद्दल वक्तव्य केले आहे. या मुलाखतीत सुनीता जरा स्पष्टच बोलली आहे.
भली मोठी पोस्ट शेअर करत मृणाल कुलकर्णींनी ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचं केलं कौतुक
‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सुनिता अहुजाने गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आणि विवाहबाह्य संबंधांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. या मुलाखतीत सुनीताने, गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाही, तसंच गोविंदा दुसऱ्या महिलेसाठी आपल्या कुटुंबाला सोडणार नाही असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. “ज्या दिवशी निश्चित होईल किंवा माझ्या आणि गोविंदाच्या तोंडून ऐकाल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मला वाटत नाही की गोविंदा माझ्याशिवाय राहू शकेल आणि मीदेखील त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. गोविंदा कोणत्याही मूर्ख व्यक्ती किंवा महिलेसाठी आपल्या कुटुंबाला सोडणार नाही. ”
“सगळेजण अफवा, अफवा म्हणतात, पण हे सत्य आहे की नाही हे तर तपासून पाहा. कोणाचे धाडस असेल तर त्याने मला थेट याबद्दल विचारले पाहिजे. कोणीतरी अफवा पसरवत आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. जर असं कधी काही घडलंच तर मी पहिली व्यक्ती असेल, जी याबद्दल मीडियासोबत संवाद साधेल. पण, प्रामाणिकपणे मला वाटते की देव आमचं घर कधीही तोडणार नाही.” गोविंदा आणि सुनिता अहुजा १९८६ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना यशवर्धन आणि टीना नावाची दोन मुलं आहेत. यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.