Javed Akhtar Reveals He Did Not Work With Amitabh Bachchan After Split With Salim Khan Reveals Why
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी त्यांच्या सिनेकरियरमध्ये अनेक वर्षे एकत्र काम केलं. अशीच एक जोडी ७० च्या दशकातही होती. त्या जोडीनं रुपेरी पडद्यावर एकत्र ११ वर्षे काम केलं. त्या दोन्ही मित्रांनी मिळून ‘शोले’, ‘जंजीर’, ‘डॉन’ सह २३ चित्रपटांचं पटकथा लेखन केलं आहे. त्या जोडीने जेव्हा केव्हा एकत्र काम केलं तेव्हा बॉलिवूडला एक हिट जबरदस्त आणि ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळाला आहे. त्यांनी केलेल्या चित्रपटांचे आजही कौतुक होत आहे.
‘जय माताजी लेट्स रॉक’ फुल्ल ऑन फॅमिली ड्रामा, टीकू तलसानिया आजारपणानंतर दिसणार पहिल्यांदाच चित्रपटात
ही सुपर डुपर हिट दुसरी तिसरी कोणी नसून सलीम खान आणि जावेद अख्तर यांची आहे. त्यांनी एकत्रित अनेक हिंदी चित्रपटांच्या कथानक लिहिली आहे. त्यांच्या सिनेकरियरमध्ये सलीम- जावेद यांची संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध जोडी होती. पण, एक वेळ अशी आली होती की, ही प्रसिद्ध जोडी वेगळी झाली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांच्यामुळे सलीम-जावेद ही जोडी वेगळी झाली होती. पण त्यामागील खरं कारण काय ? एका मुलाखतीच्या माध्यमातून जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत त्यामागील सत्य सांगितले.
“आपल्यासाठी नाही किमान आईसाठी तरी…”, मातृदिनानिमित्त अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा आईसाठी खास संदेश
जावेद अख्तर यांनी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “सलीम खानची आणि माझी फ्रेंडशिप तुटण्यापूर्वी आम्ही दोघांनीही मिळून ‘मिस्टर इंडिया’ नावाच्या चित्रपटाची संकल्पना तयार केली होती. पण गोष्टी पुढे जाण्यापूर्वीच आमची फ्रेंडशिप तुटली. म्हणूनच मी स्वतः ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचे डायलॉग, स्क्रिप्ट आणि स्क्रीन प्ले लिहिले. नंतर तो चित्रपट अनिल कपूरसोबत बनवण्यात आला. आम्ही १९८२ मध्ये वेगळे झालो, ती तारीख होती २१ जून १९८२. सलीम साहेब माझ्या घरी आले होते. आमचा संवाद तिथेच झाला. आम्ही वेगळे होण्यापूर्वीच आम्हाला ‘मिस्टर इंडिया’ ची कल्पना सुचली होती. ”
‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांगितल्या आईबद्दलच्या खास गोष्टी; पाहा Video
“आम्ही वेगळे झालो आणि सर्व परिस्थितीच बदलली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या माझ्या जवळीकतेमुळे अनेकांना वाटले की मी सलीम खान यांच्यासोबत असलेले संबंध तोडले आहेत. या अफवांमुळे मी जवळजवळ १० वर्षे अमिताभ बच्चन यांच्यासोबत कोणताही चित्रपट केला नाही. मला खूप ऑफर्स आल्या होत्या, पण मी त्यापैकी एकही ऑफर स्वीकारली नाही. कारण मला नव्हतं वाटत की, लोकांनी माझ्यावर मी कोणामुळेही फ्रेंडशिप तोडतो, असा टॅग लावावा. सलीमपासून वेगळे झाल्यानंतर, अमिताभसोबत मी केलेला पहिला चित्रपट ‘आझाद’ होता. सलीम खान त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असल्याने ते नेहमीच त्यांचा आदर करायचे. पण, स्क्रीनप्ले लिहिताना दोघांनीही एकमेकांना समान मानले. ” असं देखील मुलाखती दरम्यान जावेद अख्तर म्हणाले.