फोटो सौजन्य: सुष्मिता सेन इन्स्टाग्राम
अभिनेत्री सुष्मिता सेन वयाच्या ४९ व्या वर्षीही अविवाहितच आहे. सुष्मिता अनेकदा रिलेशनशिप्समध्ये राहिली आहे, मात्र अद्याप तिने कोणाशीच लग्न केलेलं नाही. इन्स्टाग्रामवरील लाईव्ह सेशनदरम्यान चाहत्यांसोबत गप्पा मारत असताना सुष्मिता लग्नाविषयी मनमोकळेपणे व्यक्त झाली आहे. नुकतंच लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला तिच्या एका चाहत्याने लग्नाच्या प्लॅनबद्दल प्रश्न विचारला. अभिनेत्रीने लग्न केव्हा करणार ? याचा खुलासा केला आहे.
अभिनेत्रीने खरंतर, लग्नाच्या पूर्वीच दोन मुलींना दत्तक घेतले आहे. ज्यांचा तिने सिंगल मदर म्हणून सांभाळ केला आहे. खरंतर तिचं सिंगल मदर असणं अनेकांसाठी हे प्रेरणादायी आहे. इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये अभिनेत्रीला तिच्या एका फॉलोवरने लग्न कधी करणार ? असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, “मलाही लग्न करायचंय, पण मला लग्नासाठी हवा तसा योग्य जोडीदार मिळत नाहीये. लग्न असंच तर होत नाही. असं म्हणतात की, हृदयाचे नाते रोमँटिक पद्धतीने जोडले जाते. ती व्यक्ती मनापर्यंत पोहोचली की मी लग्न करेल.”
सुष्मिता तिच्यापेक्षा १५ वर्षे वयाने लहान असणाऱ्या मॉडेल आणि अभिनेता रोहमन शॉलला डेट करण्यासाठी चर्चेत आली होती. दोघेही एकमेकांना अनेक वर्षे डेट करत होते. मात्र त्यांनी २०२१ मध्ये ब्रेकअप जाहीर केला. ब्रेकअपनंतरही सुष्मिता आणि रोहमन यांच्यात चांगली मैत्री आहे. रोहमनला अनेकदा सुष्मिता आणि तिच्या कुटुंबीयांसोबत एकत्र स्पॉट केलं आहे. रोहमनशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता आयसीसीचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघांचे मालदीव व्हेकेशनचे फोटोही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले होते. मात्र लगेचच दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा समोर आल्या.
दरम्यान, सुष्मिता सेनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सुश्मिता शेवटची ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वरील क्राईम थ्रिलर असणाऱ्या ‘आर्या’वेबसीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. तिनही सीझनमध्ये सुष्मिताने प्रमुख भूमिका साकारलीये.