काही दिवसापुर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं तिच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती. शनिवारी महिला दिनानिमित्ताने तेजस्विनी निर्माती (Tejaswini Pandit Pandit New Movie)म्हणून तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘येक नंबर’ (yek nomber)असे या चित्रपटाचे नाव असून महिलादिनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं तेजस्विनीनं सांगितलं. वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट यांची निर्मीती असलेला हा चित्रपट आहे.
[read_also content=”अजय देवगण अन् आर माधवनची चालली जादु, शैतानची पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग! https://www.navarashtra.com/ent”]
‘व्हेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.
‘येक नंबर’ अशी प्रेमकथा आहे, जी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल. संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या कथानकात अधिकच भर टाकणार आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी ‘येक नंबर’चे ५२ दिवस चित्रीकरण होणार आहे.
तेजस्विनीनं पोस्ट शेअर करत म्हण्लंट की, आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून
“येक नंबर” कारभार जमवलाय,
निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे !
ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत.
दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाने आणि संगीत अजय-अतुल.
आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे !
आजपासून “येक नंबर“ च्या चित्रीकरणास सुरुवात
गणपती बाप्पा मोरया
आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा.