काही दिवसापुर्वी तेलुगू टिव्ही इंडस्ट्रीतील आघाडाची अभिनेत्री पवित्रा जयराम (Pavithra Jayaram) हिचा रविवारी रस्ता अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील मेहबूबा नगरजवळ झालेल्या भीषण कार अपघातात तिच्या बहिणीसह आणखी दोन जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनं तेलगू सिनेविश्वाला धक्का बसला होता. आता पुन्हा एक दुखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री पवित्राचा पती अभिनेता चंद्रकातनही निधन झालं आहे. पत्नीच्या निधनामुळे चंद्रकांला प्रंचड मानसिक धक्का बसला होता. यातूनच त्याने दु:खी होत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
[read_also content=”चंदू चॅम्पियनचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, कार्तिकचा दमदार अभिनय तुमचं जिंकेल मन https://www.navarashtra.com/movies/kartik-aryan-starrer-chandu-champion-trailer-releases-nrps-535136.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता चंद्रकांत हा पत्नी पवित्रा जयरामच्या निधनानंतर प्रचंड मानसिक तणावात होता. त्याने आपल्या पत्नीसाठी एक भावूक पोस्टही लिहिली होती. पवित्रासोबतचा फोटो पाेस्ट करत तो म्हणाला की, ‘तुझ्यासोबतचा शेवटचा फोटो. मला एकटे सोडण्याचा विचार पचनी पडत नाही, माझी पावी आता नाही. प्लीज, परत ये.’ असं लिहीलं होतं.