राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘द क्रू’ या चित्रपटामुळे करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन (Kareena Kapoor Tabu And Kriti Sanon ) सध्या चर्चेत आहेत. नुकताच फर्स्ट लूक व्हिडिओ जारी करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. तर, आज चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज (Crew New Poster) करण्यात आलं आहे, ज्यामध्ये करीना, क्रिती आणि तब्बूचे लूक समोर आले आहेत. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
[read_also content=”‘डेटवर गेल्यानंतर मुलीनं बिल देणं म्हणजे मुर्खपणा’, जया बच्चन पुन्हा बोलल्या! https://www.navarashtra.com/movies/what-the-hell-navya-2-jaya-bachchan-calls-girls-who-pay-bills-on-dates-idiots-social-media-nrps-509780.html”]
क्रिती सेनननं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून ‘द क्रू’ चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये करीना कपूर, तब्बू आणि क्रिती एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत आहेत. तिन्ही अभिनेत्री त्यांच्या लाल रंगाचा फ्लाइट अटेंडंट गणवेश परिधान मध्ये छान दिसत आहेत. पोस्टर शेअर करताना क्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चेक इन करण्यासाठी सज्ज व्हा, आता द क्रूसोबत उडण्याची वेळ आली आहे.’
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात तीन अभिनेत्रींशिवाय कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॉमेडी किंग कपिल या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. एकता कपूर आणि रिया कपूर या चित्रपटाची संयुक्त निर्मिती करत आहेत. याआधी दोघांनी मिळून ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट केला होता.
‘द क्रू’च्या कथेबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट तीन महिलांच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये एअरलाइन उद्योगातील संघर्ष आणि अडचणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. करीना, तब्बू आणि करीना स्टारर चित्रपट ‘द क्रू’ 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.