बॉलिवूड गायक उदित नारायण यांनी नुकतीच केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. या भेटीत उदित नारायण यांनी शाहरुख खान आणि प्रीती झिंटाच्या ‘वीर-झारा’ चित्रपटातील ‘ऐसा देश है मेरा’ हे हिट गाणं गुणगुणलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू टेबलाच्या एका बाजूला बसले आहेत, तर दुसऱ्या बाजूला उदित नारायण बसून गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचं हे गाणं ऐकून केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू मंत्रमुग्ध झाले.
One Whole Generation grew up with his romantically melodious songs & uniquely magical voice.
Udit Narayan ji made a courtesy call pic.twitter.com/tCMKQXN3oW
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 11, 2022
व्हिडिओ शेअर करताना त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ‘एक संपूर्ण पिढी त्याच्या रोमँटिकली मधुर गाणी आणि अनोख्या जादुई आवाजाने मोठी झाली. उदित नारायणजी यांना भेटून आनंद झाला. त्यांची अविस्मरणीय गाणी विसरू शकत नाही. ‘पापा कहते हैं बड़ा नाम’, ‘ऐ मेरे हम सफर, ‘कोई मिला गया’, ‘पहले ड्रग’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘कहो ना प्यार है’, ‘मैं निकला गड लेके’ , ‘दिल ने यह कहा है दिल से’ उदित नारायणचे हे गीत लोकांना स्वतःकडे आकर्षित करत आहे. त्याचबरोबर चाहते या गाण्याला लाईक करून प्रतिक्रिया देत आहेत.