
ग्रे हॅमलिनचा ड्रेस पाहिल्यानंतर उर्फी जावेदच्या फॅशन सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्रोलर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या आउटफिटमध्ये ज्यांनी उर्फीला आधीच ट्रोल केलं होतं ते आता ‘प्रत्येकजण आमची उर्फी कॉपी करत आहे’ अशी कमेंट करताना दिसत आहेत.
अमेलिया ग्रे हॅमलिननं उर्फीसारखा ड्रेस घातल्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियावर उर्फीचं कौतुक करत आहेत. एक युझर म्हणतोय की, उर्फीचं फॅशन सेन्स आंतरराष्ट्रीय स्तरावरच आहे. कुणी म्हणतयं की, उर्फीला मेट गालामध्ये बोलवायल हवं. तर कुणी म्हणतयं की, उर्फी ही खूप टॅलेंटेड आहे. ती या सगळ्या सेलेब्रिटीपेक्षा छान दिसत आहे.






