DC vs PBKS Live Streaming (फोटो- ians)
पंजाबला मिळाले होते 265 रन्सचे टार्गेट
केएल राहुलने केले नाबाद दीड शतक
प्रभसिमरन अन् प्रियांशने पंजाबला दिली वादळी सुरुवात
Tata IPL 2026 DC Vs PBKS Live Updates: आज अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स अन् पंजाब किंग्जमध्ये सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरल्याचे दिसून आले. केएल राहुलच्या 152 रन्स आणि नितीश राणाच्या तडाखेबंद खेळीच्या (IPL 2026) जोरावर दिल्लीने 264 रन्स केल्या. दरम्यान या सामन्यात पंजाब किंग्जने 6 विकेट्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे.
पंजाब किंग्जची फलंदाजी
265 रन्सचा पाठलाग करण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्याने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी 3 ओव्हर्समध्ये 50 पेक्षा जास्त रन्सची पार्टनरशिप केली. प्रभसिमरन सिंहने 26 बॉल्समध्ये 76 रन्सची वादळी खेळी करत पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. प्रभसिमरन 76 रन्स करून आउट झाला. तर प्रियांश आर्या 43 रन्स करून आउट झाला.
Talk about a response 👌 1⃣8⃣-ball FIFTY for the high-flying Prabhsimran Singh 🔥#PBKS 116/0 after 6 overs in the chase 🏃♂️ Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @PunjabKingsIPL | @prabhsimran01 pic.twitter.com/MZcY9L2kKR — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि कूपर कॉनली पंजाबची धावसंख्या पुढे नेण्यासाठी सावध पण आक्रमक खेळी करत होते. मात्र कूपर कॉनली मोठा फटका मारण्याच्या नादात 17 रन्स करून आउट झाला.नेहाल वढेरा आणि श्रेयस अय्यरने पंजाबचा डाव सांभाळला. विप्रज निगमने नेहालला 25 रन्सवर आउट केले. करुण नायरने दोन वेळेस कर्णधार श्रेयस अय्यरचा कॅच सोडला. जीवदान मिळाल्यावर श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक केले. त्याने 62 रन्स केल्या.
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांना पंजाब किंग्जने एकही विकेट मिळू दिली नाही. मात्र पहिली विकेट दिल्लीला अक्षर पटेलने मिळवून दिली. त्याने प्रियांश आर्याला आउट केले. तर कुलदडेप यादवने प्रभसिमरन सिंह आणि कूपर कॉनलीला आउट केले. त्यामुळे पंजाबचा संघ अडचणीत सापडला होता. विप्रज निगमने नेहालला 25 रन्सवर आउट केले.
KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी पथूम निसांका आणि केएल. राहुल मैदानात उतरले. दोघांनी सावध पवित्रा घेत डावाची सुरुवात केली. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पथूम निसांका 11 रन्स करून आउट झाला. आजच्या सामन्यात देखील तो साजेशी खेळी करू शकला नाही. त्यानंतर फॉर्मसाठी झगडत असणारा नितीश राणा खेळण्यासाठी आला. केएल राहुलने दीड शतक केले. त्याने 152 रन्स केल्या. केएल राहुल आणि नितीश राणाने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. केएल राहुलने शानदार शकत लगावले आहे. तर नितीश राणाने देखील जबरदस्त खेळी केली आहे. गेल्या काही सामन्यात त्याचा फॉर्म चांगला नव्हता मात्र त्याने आजच्या सामन्यात सगळी उणीव भरून काढली आहे. डेव्हिड मिलरने 3 बॉलमध्ये 3 रन्स केल्या. त्यामुळे पंजाब किंग्जसमोर दिल्लीच्या संघाने भला मोठा डोंगर उभा केला.
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने पहिली ओव्हर टाकली. पहिले काही ओव्हर रन्स करण्यासाठी फलंदाजांना मेहनत करावी लागली. अखेर तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग निसांकाला आउट केले. पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना केएल राहुल आणि नितीश राणा यांनी अक्षरश: रडवले आहे. निसांका नंतर त्यांना एकही विकेट मिळवता आलेली नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये झेवियर बार्टलेटने नितीश राणाला आउट केले.
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.
DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.






