Hina Khan marries boyfriend Rocky Jaiswal, shares stunning photos from wedding ceremony
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. सतत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीने आता लग्नगाठ बांधली आहे. बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत हिना खानने आज लग्नगाठ बांधली आहे.. या आजारपणाच्या काळात अभिनेत्रीला तिचा लाँगटाईम बॉयफ्रेंडने विशेष साथ दिली होती. हिना आणि रॉकी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सेलिब्रिटी कपलने आज रजिस्टर मॅरेज केले आहे. अखेर हिनाने रॉकीसोबत लग्नगाठ बांधली आहे. हिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. तिने त्या दोघांच्या लग्नाचे अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचं नाणं खणखणीत, २५० व्या प्रयोगावर प्रिया बापटची स्पेशल पोस्ट
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री हिना खान हिने काही लग्नाचे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. “दोन वेगवेगळ्या जगातून आम्ही आमचे प्रेमाचे विश्व निर्माण केले आहेत. आमच्यामध्ये असलेले मतभेद आता नाहीसे झाले. आमचे हृदय एक झाले. एक असं बंधन जे आयुष्यभर टिकून राहणारे आहे. आम्ही आमचं घर, एकमेकांसाठी प्रकाश, एकमेकांसाठी आशा- आकांक्षा आहोत आणि एकत्रितपणे आम्ही एकमेकांच्या संकटांवर मात करतो. आज, आमचे मिलन प्रेम आणि कायद्याने कायमचे बंद झाले आहे. पत्नी आणि पती म्हणून आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतोय.” असं कॅप्शन देत हिनाने चाहत्यांना रॉकी जयस्वालसोबत लग्न केल्याचे सांगितले आहे. रॉकी जयस्वाल आणि हिना खानने कोर्ट मॅरेज केलं आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांनीही लग्नामध्ये ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केला होता. हिनाने डिझायनिंग साडी आणि डोक्यावर ओढणी तर तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल हिने कुर्ता आणि पायजमा वेअर केले होते. हिनाच्या साडीवर व्हाईट डायमंडने डिझाईन केलेली आहे. तर तिने ज्वेलरीही बांगड्या, पैंजन, अंगठी, माथ्यावरील बिंदी आणि नेकलेस हे दागिने देखील व्हाईट डायमंडने पूर्ण केलेल्या आहेत. दोघांनीही एकमेकांना मॅचिंग लूक केल्यामुळे ते दोघेही एकमेकांना पेअर दिसले. हिना आणि रॉकीने रोमँटिक, केअरिंग आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसले. चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही हिनाला आणि रॉकीला आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे. काही तासांपूर्वीच हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने आज अर्थात ४ जून रोजी बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत कोर्ट मॅरेज केले आहेत.
वादाच्या भोवऱ्यातही ‘Thug Life’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सुस्साट, देशभरात जमावला करोडोंचा गल्ला
‘यह रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानच्या कठीण काळात तिच्या पाठीशी तिचा पती रॉकी जयस्वाल उभा राहिला होता. रॉकी जयस्वालचं खरं नाव जयंत जयस्वाल असं आहे. तो एक प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माता आणि उद्योगपती आहे. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये पडद्यामागील काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. तो हिनासोबतच्या नात्यामुळे कायमच चर्चेत राहिला. हिनासोबतची त्याची प्रेमकहाणी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या सेटवर सुरू झाली. त्याने मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या काही वर्षांत त्यांचे नाते आणखी घट्ट झाले आहे. ते अनेकदा एकत्र दिसले आहेत.