The Play Jar Tar Chi Gosht Will Soon Complete 250 Shows On Marathi Theatre
प्रिया बापट आणि उमेश कामत हे कपल मराठी फिल्म इंडस्ट्रीतील फेव्हरेट कपलपैकी एक असून या दोघांचीही आपल्या चाहत्यांमध्ये कायमच जोरदार चर्चा असते. गेल्या काही दिवसांपासून हे कपल त्यांच्या ‘जर तर ची गोष्ट’ नाटकामुळे जबरदस्त चर्चेत आहे. ‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचा मराठी रंगभूमीवरील ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झालेला प्रवास आता २५० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि हैदराबादमध्ये त्यानंतर परदेशातही दौरे करत या नाटकाने नॉट आऊट आपला प्रवास कायम ठेवला आहे. अभिनेत्री प्रिया बापट हिने नाटकाच्या २५० व्या प्रयोगाबद्दल खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली.
Roadies XX संपूर्ण स्क्रिप्टेड शो? उपविजेता हरताज सिंग गिलने सांगितलं सत्य, म्हणाला…
अगदी पहिल्या प्रयोगाला ॲडव्हान्स बुकिंगपासून सुरुवात झालेला हा प्रवास हाऊसफुल्लच्या पाटीपर्यंत कसा पोहोचला काही कळलंच नाही. या नाटकाच्या अनेक प्रयोगांवेळी ‘हाऊसफुल्ल’ची पाटी लागलेली आपण पाहिली देखील असेल. दरम्यान, नाटकाचा येत्या १४ जूनला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात २५० वा प्रयोग पार पडणार आहे. यावेळी अभिनेत्रीने नाट्यरसिक प्रेमींना नाटकाला येण्याचं आवाहन केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय स्टारर ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक मराठी रंगभूमी गाजवत आहे. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंदीस पडत असून रिलेशनशिपवर भाष्य करणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांची अल्पावधीतच मनं जिंकली आहेत.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रिया बापटने लिहिलेय की, “कुठल्याही “जर तर”मध्ये न अडकता, प्रयोग ॲडव्हान्समध्ये हाऊसफुल्ल करत दणक्यात सुरू झाला या नाटकाचा प्रवास. ५ॲागस्ट २०२३ ला पहिला प्रयोग झाला. भरभरून प्रेम, हाऊसफुल्लचे अनेक बोर्ड, परदेशी दौरे, गुजरात, हैदराबादमध्ये प्रयोग आणि महाराष्ट्रात मिळालेलं अतोनात प्रेम घेऊन आता २५० वा प्रयोग करण्यासाठी सज्ज झालो आहोत. १४ जून रात्री ९.३० वा बालगंधर्व रंगमंदिर पुणे! जल्लोषात साजरा करूया… “जर तर ची गोष्ट”चा २५० वा प्रयोग. या, वाट पाहतोय.” प्रिया बापटने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चाहत्यांनी नाटकातील सेलिब्रिटींच्या अभिनयाचे भरभरुन कौतुक केले.
“स्टार किड असणं…”, अध्ययन सुमनलाही करावा लागला रिजेक्शन्सचा सामना; ‘घराणेशाही’वर स्पष्टच म्हणाला…
“सध्या पाहिलेल्या मराठी नाटकांमधलं एकमेव उत्तम नाटक आहे. उत्कृष्ट अभिनय, दमदार संवाद आणि अफलातून दिग्दर्शन… तुम्ही सर्व असंच काम करत राहा…”, “हे नाटक खूपच छान आहे आणि तुम्हा सगळ्यांचा अभिनय देखील खूप आवडला 250th show साठी all the best!”, “अजून बरेच काही पाहायला मिळणार आहे, टीमचे हार्दिक अभिनंदन.”, “खूपच सुंदर अभिनंदन” तर अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींनीही प्रिया बापट आणि उमेश कामत यांचे कौतुक केले आहे.