फोटो सौजन्य: झी मराठी इन्स्टाग्राम
सध्या झी मराठीवरील ‘लक्ष्मीनिवास’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अगदी टेलिकास्ट होण्याच्या पहिल्या दिवसापासून ही मालिका प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिली आहे. ही मालिका रोज १ तास टेलिकास्ट होत आहे. नुकताच मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवी यांचं लग्न झालेलं पाहायला मिळाले. ‘लक्ष्मीनिवास’ आणि ‘पारु’ या दोन्हीही मालिकांचा यांचा महासंगम पाहायला मिळाला. ‘पारू’मधील आदित्य- अनुष्काचा साखरपुडा आणि ‘लक्ष्मी निवास’ मधील जान्हवी- जयंतचं लग्न असे दोन सोहळे एकाच ठिकाणी पार पडले. मात्र आता, ‘लक्ष्मीनिवास’ मालिकेमध्ये लग्न स्पेशल भागांच्या भव्यतेचे कौतुक झाल्यानंतर आगामी एपिसोडचा प्रोमो कमालीचा ट्रोल झाला आहे.
सानिका – सरकारच्या आयुष्यात नवं संकट येणार, “लय आवडतेस तू मला”मध्ये येणार नवा ट्वीस्ट
काही तासांपूर्वीच झी मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘लक्ष्मीनिवास’ मालिकेचा आगामी भागातला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, जयंत आणि जान्हवी लग्नानंतर त्यांच्या घरी येतात. तो घरी एकटा राहत असल्यामुळे त्याच्या घरी जान्हवीचं स्वागत करण्यासाठी कोणीच नसतं. यामुळे जयंत स्वत: तिचं औक्षण करून तिचा गृहप्रवेशही करतो. आपला पती स्वत:च्याच हाताने आपलं स्वागत करतोय, म्हटल्यावर जान्हवीही आनंदीत असते. कायमच सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारा जयंतचा नवा स्वभाव पाहून जान्हवी काही अंशी घाबरते, असे प्रोमोमध्ये दिसतेय.
जयंतने जान्हवीचं घरात स्वागत केल्यानंतर जान्हवी नवऱ्यासाठी दूध घेऊन खोलीत येते. यावेळी तिच्या साडीवर अचानक झुरळ असतं. आपल्या नवऱ्याला दूध दिल्यानंतर तिचं लक्ष अचानक साडीवर असलेल्या झुरळाकडे जातं. त्या झुरळाला पाहून ती जोरात किंचाळते. जान्हवी घाबरल्याचं पाहून जयंत काहीसा विचलित होतो आणि झुरळाला पाहून, “या झुरळाने माझ्या जान्हवीला त्रास दिलाय, शिक्षा तर भोगावी लागेल” असं म्हणतो. यानंतर जयंत ते झुरळ मारून त्याला दुधात टाकून ते दूध पितो. हे सगळं पाहून जान्हवी प्रचंड बिथरते. लग्नानंतर पहिल्याच दिवशी जयंतमधील ही मानसिक विकृती पाहून ती खूप घाबरून जाते. ४ आणि ५ फेब्रुवारीला हा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेला सीन हिंदी मालिकेतून कॉपी केल्याचा आरोप या मालिकेवर होतो आहे.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर हा प्रोमो शेअर करण्यात आला असून, ‘जयंतचं हे रुप पाहून जान्हवी घाबरेल का?’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. असा विचित्र कंटेंट दाखवत असल्यामुळे मालिकेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होतेय, हा झुरळ खाण्याचा सीन जुन्या हिंदी मालिकेतून कॉपी केल्याचा आरोपही प्रेक्षकांनी केला आहे. ‘लक्ष्मी निवास’मधील हा सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांना करणवीर बोहरा आणि सृती झा यांची ‘सौभाग्यवती भव’ ही मालिका आठवली. ज्यात या कलाकारांनी विराज आणि जान्हवीचे पात्र साकारले होते. त्यांचे जेव्हा लग्न होते, तेव्हाही अगदी हेच दृश्य दाखवण्यात आले होते. त्याच मालिकेतून ‘लक्ष्मी निवास’ने कॉपी केल्याची टीका चाहते करत आहेत. याविषयी काही कमेंटही आल्या आहेत.
Parvati Nair: ‘द गोट’ फेम अभिनेत्रीने केला साखरपुढा; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी!
‘लक्ष्मीनिवास’च्या प्रोमोवर नेटकरी कमेंट करत म्हणतात, ‘अरे इतक्या दिवस कौतुक करून घेतलं, आता हे असलं काही दाखवू नका.’, ‘सौभाग्यवती भव:ची कॉपी.’, ‘आधीच माहित होतं आम्हाला जयंत सायको दाखवणार.’, ‘अरे लाईफ ओके चॅनलवरच्या सौभाग्यवती भव: हिंदी मालिकेची कॉपी केली यांनी… विराज-जान्हवी’, ‘तरीच म्हटलं एवढं चांगलं कसं दाखवत आहेत’, ‘हा ट्रॅक दाखवण्याची गरज नव्हती, मग यांचं लग्न थाटात का केलं’, ‘बापरे काय ट्विस्ट आहे’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमोवर केलेल्या आहेत.