फोटो सौजन्य: Social Media
तेरे इश्क में हा चित्रपट रांझनापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. मात्र, जेव्हा चित्रपटातील नायक शंकर आपल्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी वाराणसीला येतो. तेव्हा, तिकडे त्याची भेट मुरारी सोबत होते. तेव्हा मुरारी शंकरला त्यांच्या मित्राबद्दल म्हणेजच कुंदनबद्दल सांगतो. ‘प्यार में मृत्यू है, मोक्ष नही” हा मुरारीचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शंकर आणि मुरारीच्या संभाषणादरम्यान ‘तुम तक’ गाण्याचे म्युझिक बॅकग्राऊंडला वाजते. ज्यामुळे हा सिन अजून उठावदार झाला आहे. तसेच झीशान अय्यूबला पुन्हा एकदा मुरारीच्या रूपात पाहिल्याने रांझना चित्रपटाचा चाहता वर्ग खुश झाला आहे.
अभिनेता झीशान अय्यूब यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या अपार प्रेमामुळे ते खूप भारावून गेले आहेत. सतत येणारे मेसेज आणि फोन पाहून त्यांना त्यांच्या ‘रांझणा’ चित्रपटाच्या वेळेस मिळालेल्या प्रतिसादाची आठवण झाली. यावेळी त्यांना अधिक प्रेम मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि ते यासाठी खूप खूश व आभारी आहेत.
धनुषसोबतच्या आपल्या खास नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते दोघे फक्त मित्र नसून भाऊ आहेत. धनुषने मस्करीत फोन करून सांगितले की, मी पूर्ण सिनेमा केला आणि तू फक्त एक सिन. मात्र, प्रेक्षक तुझेच कौतुक जास्त करत आहे. शूटिंगच्या वेळी भेट झाल्यावर आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रेमाने मिठी मारली. इतक्या वर्षांनंतर भेटल्याने आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. चित्रपटातील हा भावनिक क्षण पाहून दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी लगेच अंदाज वर्तवला होता की हा सीन नक्कीच हिट होणार. अपेक्षेनुसार, ‘मुरारी’ची भूमिका जिवंत करणारा तो सीन थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला आणि प्रचंड गाजला.






