भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला आहे. नुकताच रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत. आज म्हणजेच २१ डिसेंबर रोजी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवशी रोहित शर्माने त्याच्या पत्नीला तिच्या खास दिनी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित शर्माची रितिकाच्या वाढदिवशी खास पोस्ट - फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माने त्याची पत्नी रितिका सजदेह हिच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर करून खास मेसेज शेअर केला आहे.फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहितने इंस्टाग्रामवर एका भावनिक नोटमध्ये आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. रोहितने लिहिले, “रिट्स या दिवसाच्या अनेक शुभेच्छा. तू माझ्यासोबत आहेस हे जाणून आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी कृतज्ञ आहे. तुझा दिवस चांगला जावो.” फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रितिका नेहमीच जेव्हा रोहित शर्मा सामना खेळत असतो तेव्हा ती त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये असते. आता नुकतेच ते आई बाबा झाले आहेत त्यामुळे ती सध्या भारतात आहे आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला सामने खेळत आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
13 डिसेंबर 2015 रोजी विवाहबंधनात अडकलेले रोहित आणि रितिका समायरा आणि अहान या दोन मुलांचे पालक आहेत. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे पर्थमधील मालिकेतील पहिला सामना खेळू न शकलेल्या रोहितने या दौऱ्यात आतापर्यंत 3, 6 आणि 10 धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा विवाह मुंबईतील ताज लँड्स एंड येथे एका भव्य समारंभात झाला. हे जोडपे 2008 मध्ये भेटले आणि 3 जून 2015 रोजी लग्न करण्यापूर्वी सुमारे सहा वर्षे डेट केले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया