राज्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार आज त्यांचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज्यासह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कालपासूनच अजित पवार यांच्या समर्थकांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु केले आहे. आतिषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्ते अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.
अजित पवार यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांना पांढरे गुलाब दिले
अजित पवार यांना चिमुकल्यांनी देखील मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाचे गाणे गात चिमुकल्यांनी पवारांना खास शुभेच्छा दिल्या (फोटो सौजन्य - अजित पवार फेसबुक)
अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस जोरदार सेलिब्रेट केला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांचे पक्षचिन्ह असलेल्या घड्याळचा खास केक आणला आहे
वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार यांनी रांजणगाव गणपतीला भेट दिली. यावेळी त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण केले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये विलक्षण उत्साह दिसून येत आहे. गावोगावी त्यांचे जोरदार स्वागत केले जात असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे