नवी मुंबईतील सारसोळे खाडीत डॉल्फिनचे दर्शन; पहा VIDEO
नवी मुंबई : स्थानिक मच्छिमार हे सारसोळे खाडीतून मच्छी पकडण्यास जात असतात. खाडी किनाऱ्यापासून दूर गेल्यावर मच्छिमारांना डॉल्फिनचे दर्शन घडले. डॉल्फिन हे स्वच्छ पाण्यात आढळतात. खाडीच्या मध्यभागी गेल्यावर स्वच्छ पाणी असल्याने डॉल्फिन आले असावेत असे कोलवणी माता मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी माहिती देताना सांगितले. (व्हिडिओ सौजन्य : सिद्धेश प्रधान)